शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

फाईल गहाळप्रकरणी अधिकाऱ्यांवर फौजदारी

By admin | Updated: April 30, 2015 00:23 IST

विवेक कुलकर्णी : न्यायालयाचे आदेश

सांगली : विश्रामबाग येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या आरक्षित जागेसंदर्भातील फाईल गहाळ झाल्याप्रकरणी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती संस्थेचे सल्लागार अ‍ॅड. विवेक कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.कुलकर्णी म्हणाले, स्वा. सावरकर प्रतिष्ठान संस्थेस शैक्षणिक कामाबाबत आरक्षित असलेली सिटी सर्व्हे क्र. ३६३/२ ब मधील जागा १९८७ मध्ये कब्जेपट्टी करून दिलेली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने ही जागा शैक्षणिक संस्थेस गुणवत्तेवर द्यावी, असा निकाल दिला होता. परंतु तत्कालीन राज्य शासनाने ही जागा मूळ मालकास परत केली. यासंदर्भात ५ सप्टेंबर २००८ रोजी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता, मंत्रालयातील नागरी विकास खात्याच्या माहिती अधिकाऱ्यांनी यासंंबंधीची फाईल उपलब्ध नसल्याचे कळविले होते. या निर्णयावर पुन्हा १५ जून २००९ रोजी माहिती आयुक्तांकडे अपील केले असता, त्यांनी १८ आॅगस्ट २०११ रोजी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. परंतु याची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयात २२ जुलै २०१२ रोजी रिट अर्ज दाखल करण्यात आलेला होता. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय ओक आणि ए. एस. गडकरी यांंच्या खंडपीठाने संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी, उपायुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सहा महिन्यात तपास पूर्ण करावा, असा आदेश दिला असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कब्जेपट्टीने जागा दिलीस्वा. सावरकर प्रतिष्ठान संस्थेस आरक्षित असलेली सिटी सर्व्हे क्र. ३६३/२ ब मधील जागा १९८७ मध्ये कब्जेपट्टी करून दिलेली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थेस गुणवत्तेवर जागा द्यावी, असा निकाल दिला होता.