शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अटल भुजल योजनेच्या माध्यमातून जल चळवळ उभी करा : कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 13:34 IST

water scarcity Sangli-जलदिन दिनांक 22 मार्च रोजी साजरा केला जातो . सन 2021 च्या जलदिनानिमित्त दि. 22 ते 27 मार्च जलसप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. याचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दि. 23 मार्च 2021 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेच्या माध्यमातून सांगलीच्या जनतेस जल चळवळ उभी करावी, असे आवाहन केले.

ठळक मुद्दे अटल भुजल योजनेच्या माध्यमातून जल चळवळ उभी करा : कलशेट्टीचार तालुक्यातील एकूण 92 गावांमध्ये जल चळवळ

सांगली : जलदिन दिनांक 22 मार्च रोजी साजरा केला जातो . सन 2021 च्या जलदिनानिमित्त दि. 22 ते 27 मार्च जलसप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. याचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दि. 23 मार्च 2021 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेच्या माध्यमातून सांगलीच्या जनतेस जल चळवळ उभी करावी, असे आवाहन केले.अटल भुजल योजना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव या चार तालुक्यातील एकूण 92 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेस संबंधित तालुक्यातील तहसिलदार व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

या जल चळवळीस लोकसहभागाची जोड देवून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करू, असे तहसिलदार खानापूर यांनी यावेळी आश्वासित केले. गट विकास अधिकारी कवठेमहांकाळ, जत तसेच तासगाव यांनी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून योजना प्रभावीपणे राबवू असे सांगितले.तसेच जागतिक जल दिन 22 मार्च, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली कार्यालयात जल प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्यात आला. निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेत असताना जलदिनानिमित्त जनजागृती हेतू ठेवून निरीक्षण विहिरींची माहिती संबंधित गावातील गावकऱ्यांना देण्यात आली, यामध्ये भूजल पातळी कशी मोजली जाते याची ग्रामस्थांना माहिती दिली.

याचबरोबर सांगली आकाशवाणी केंद्राला, वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. एस. गोसकी यांनी मुलाखतीद्वारे जनजागृती केली. यामध्ये अटल भुजल योजनेच्या अनुषंगाने ही माहिती प्रसारित करण्यात आली. दैनंदिन वापरामध्ये पाण्याची होऊ शकणारी बचत यावर चर्चा झाली. पाण्याचे प्रदूषण थांबवून पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना जनतेचा प्रतिसाद अत्यावश्यक असल्याने, जनतेच्या सक्रीय सहभागासाठी आवाहन करण्यात आले.सध्या कोवडि-19 च्या पार्श्वभूमीवर व्हाट्सअप ग्रुप द्वारे सुरू असणाऱ्या शाळांच्या ग्रुपवर पाण्याचे महत्त्व सांगणारे व्हिडिओ पाठवण्यात आले. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी व्हाट्सअप स्टेटसला पाण्याचे महत्व सांगणारे चित्रे, व्हिडिओ लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगली