शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गृहोद्योगाचे आमिष; सांगली, कोल्हापुरातील महिलांना ८५ लाखांचा गंडा घालणारे जोडपे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:38 IST

सांगली : गृहोद्योगाच्या आमिषाने सुमारे १८०० महिलांची ८६ लाखांची फसवणूक करणाऱ्या जोडप्याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. गेल्या डिसेंबर महिन्यांपासून ...

सांगली : गृहोद्योगाच्या आमिषाने सुमारे १८०० महिलांची ८६ लाखांची फसवणूक करणाऱ्या जोडप्याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. गेल्या डिसेंबर महिन्यांपासून त्यांचा शोध सुरू होता.लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर आणि कविता राजकुमार शिंदे ऊर्फ कविता लक्ष्मण बंडगर (मूळ मु.पो. कास्तीखुर्द, ता. लोहारा. जि. धाराशिव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात २१ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. चंद्रकांत महादेव कडोले (वय ५९, रा. प्रगती कॉलनी, १०० फुटी रस्ता, सांगली) यांनी तक्रार दिली होती. ३ जानेवारी ते १४ जुलै २०२४ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला होता. या जोडप्याने सांगलीत १०० फुटी रस्त्यावर रामकृष्ण परमहंस सोसायटीत गुरुकृपा महिला गृहोद्योग सुरू केला होता. या उद्योगात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून महिलांनी पैसे गुंतविले होते. या दोघा संशयितांनी सांगली, मिरज, पलूस, तासगाव, कोल्हापूरमध्ये जाऊन महिलांना आमिष दाखविले होते. उद्योगात सभासद होण्यासाठी प्रत्येक महिलेकडून १० ते १५ हजार रुपये घेतले. ही रक्कम ठेव म्हणून स्वीकारली. त्या मोबदल्यात महिलांना चटणी पॅकिंगचे काम दिले. मजुरी म्हणून प्रत्येक १० किलो पॅकिंगसाठी दर आठवड्याला १२०० रुपये मोबदला दिला.जानेवारी ते जुलै या कालावधीत सुमारे १८०० महिलांना सभासद करून घेतले. सुरुवातीला मजुरी नियमितपणे दिली व काही दिवसांनी आणखी परतावा मिळेल असे सांगितले. त्याचबरोबर या महिलांना सभासद करून घेतले. त्यांच्याकडूनही ठेवीचे पैसे घेतले. त्यानंतर गुरुकृपा गृहोद्योग बंद करून दोघेही गायब झाले. या सर्व महिलांची सुमारे ८६ लाख २८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. यातील लक्ष्मण बंडगर याला अटक केली असून, कविता बंडगर हिला प्रतिबंधात्मक नोटीस दिली आहे. ही कारवाई निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल पोवार, महादेव घेरडे, सुनील पाटील, विजय पाटणकर यांनी केली.पुण्यातून मंगळवेढ्यात पळालेया जोडप्याविरोधात फिर्याद दाखल होताच विश्रामबाग पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. गेले तीन महिने ते पोलिसांना गुंगारा देत होते. दोघे पुण्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली, तोपर्यंत ते तेथूनही गायब झाले होते. तपासाअंती मंगळवेढ्याला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्या मोबाइल लोकेशनद्वारे माग काढत मंगळवेढ्यात दोघांनाही ताब्यात घेतले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस