corona virus : सांगली जिल्ह्यात दोन दिवसात दीड हजार जणांना कोरोना; ४७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:26 PM2020-09-03T17:26:08+5:302020-09-03T17:27:56+5:30

सांगली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दोन दिवसात तब्बल १५०३ जणांना नव्याने लागण झाल्याचे दिसून आले असून, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात दोन दिवसात ५९७ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ५७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

corona virus: Corona virus kills 1,500 people in Sangli district in two days; 47 killed; | corona virus : सांगली जिल्ह्यात दोन दिवसात दीड हजार जणांना कोरोना; ४७ जणांचा मृत्यू

corona virus : सांगली जिल्ह्यात दोन दिवसात दीड हजार जणांना कोरोना; ४७ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात दोन दिवसात दीड हजार जणांना कोरोना; ४७ जणांचा मृत्यूमहापालिका क्षेत्रात ३३३ नवे रुग्ण; दोन दिवसात ५७१ जण कोरोनामुक्त

सांगली : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दोन दिवसात तब्बल १५०३ जणांना नव्याने लागण झाल्याचे दिसून आले असून, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात दोन दिवसात ५९७ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ५७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

बुधवारी जिल्ह्यात ७३५ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मिरज येथील ७० वर्षीय वृध्द, ५९ वर्षीय व्यक्ती, ७० वर्षीय, ६३ वर्षीय वृध्दा, हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ७५ वर्षीय वृध्दा, आरेवाडी येथील ८० वर्षीय वृध्द, तानंग (ता. मिरज) येथील ४६ वर्षीय व्यक्ती, बेडग येथील ६० वर्षीय महिला, काकडवाडी येथील ४३ वर्षीय, येळावी (ता. तासगाव) येथील ७९ वर्षीय वृध्द, वासुंबे येथील ६८ वर्षीय वृध्द, जत येथील ४९ वर्षीय, ७० वर्षीय आणि ५५ वर्षीय महिला, कुपवाड येथील ६२ वर्षीय व्यक्ती, सांगली येथील ६७ वर्षीय वृध्द, ७९ वर्षीय वृध्दा, ७५ वर्षीय वृध्दा, निंबवडे (ता. आटपाडी) येथील ७८ वर्षीय वृध्द, आष्टा येथील ५६ वर्षीय, नवेखेड येथील ६५ वर्षीय, कासेगाव येथील ४२ वर्षीय महिला, तसेच शिंगटेवाडी (ता. शिराळा) येथील ७२ वर्षीय वृध्देच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ५४२ झाली आहे.

बुधवारी महापालिका क्षेत्रात ३३३ नवे रुग्ण आढळले असून यात सांगलीतील १९०, तर मिरजेतील १४३ जणांचा समावेश आहे. वाळवा तालुक्यात ६८ नवे रुग्ण आढळले असून यात इस्लामपूर, घबकवाडी, नवेखेड, तांदुळवाडी, कारंदवाडी, आष्टा, बागणी, फारणेवाडी, ढवळी, वाळवा, बोरगाव, ताकारी, तांबवे, पेठ, चिकुर्डे, रेठरेहरणाक्ष, बहे येथील रुग्णांचा समावेश आहे.

मिरज तालुक्यात ६० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे यात दुधगाव, कसबेडिग्रज, हरिपूर, माधवनगर, बुधगाव, कवलापूर, मालगाव, नांद्रे, सलगरे, म्हैसाळ, कवठेपिरान, भोसे, मौजे डिग्रज, समडोळी, सोनी आदी गावातील रुग्ण आहेत. पलूस तालुक्यात ५२ रुग्ण आढळले आहेत. यात पलूस, कुंडल, बांबवडे, पुणदी, सावंतपूर, रामानंदनगर, बुर्ली, ब्रम्हनाळ, किर्लोस्करवाडी, अंकलखोप येथील रुग्णांचा समावेश आहे. तासगाव तालुक्यात पुणदी, सावळज, कुमठे, मणेराजुरी, कवठेएकंद, वासुंबे, मतकुणकी, अंजनी, खुजगाव, जरंडी, मांजर्डे, बोरगाव येथील ४६ रुग्ण आहेत.

Web Title: corona virus: Corona virus kills 1,500 people in Sangli district in two days; 47 killed;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.