जिल्ह्यात दिवसभरात ८९१५ जणांचे कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:12+5:302021-04-18T04:26:12+5:30

मिरजेत महापालिका रुग्णालयात ज्येष्ठ महिलांनी कोरोनाची लस घेतली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ८९१५ जणांना कोरोनाची ...

Corona vaccination of 8915 persons in the district during the day | जिल्ह्यात दिवसभरात ८९१५ जणांचे कोरोना लसीकरण

जिल्ह्यात दिवसभरात ८९१५ जणांचे कोरोना लसीकरण

मिरजेत महापालिका रुग्णालयात ज्येष्ठ महिलांनी कोरोनाची लस घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ८९१५ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. लसीचा जेमतेम साठा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम कोलमडली. सुमारे साठ टक्के केंद्रांवर लसीअभावी नागरिकांना परत जावे लागले.

जिल्ह्यात सध्या २७२ केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. त्यापैकी १५० केंद्रांवर दुपारपर्यंत लस संपली. दोन दिवसांपूर्वी पुण्याहून २५ हजार डोस मिळाले होते. लसीकरणासाठी नागरिक गर्दी करत असल्याने शनिवारीच ती संपली. आरोग्य विभागाने नव्याने पुरवठ्याची मागणी केली आहे. रविवारी सकाळपर्यंत ती मिळण्याची अपेक्षा आहे, असे लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले. लस आली तर रविवारीदेखील लसीकरण सुुरू राहील, असे ते म्हणाले. दरम्यान, अनेक लाभार्थ्यांचा लसीचा दुसरा डोस सुरू झाला आहे, त्यांना लसीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लस घेण्यात काही दिवसांचा विलंब झाला तरी चालण्यासारखे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आजवरचे एकूण लसीकरण ३ लाख ९६ हजार ६०७ इतके झाले आहे. लसीकरणाने गती घेतल्याने हा पल्ला गाठता आला, असे डॉ. पाटील म्हणाले.

चौकट

शनिवारी दिवसभरातील लसीकरण

पहिला डोस - ८०९४

दुसरा डोस - ८२१

ग्रामीण भागात - ५५४६

निमशहरी - १०७७

महापालिका क्षेत्रात - १९०३

खासगी रुग्णालये - ३८९

आजवरचे एकूण लसीकरण - ३,९६,६०७

Web Title: Corona vaccination of 8915 persons in the district during the day