वीर सेवा दलाचे समाजातील योगदान मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:15+5:302021-02-05T07:29:15+5:30

दुधगाव (ता. मिरज) येथील वीर सेवा दल संचलित लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचे बाबासाहेब नानगोडा पाटील इंग्लिश मेडियम स्कूल ...

The contribution of Veer Seva Dal in the society is invaluable | वीर सेवा दलाचे समाजातील योगदान मोलाचे

वीर सेवा दलाचे समाजातील योगदान मोलाचे

दुधगाव (ता. मिरज) येथील वीर सेवा दल संचलित लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचे बाबासाहेब नानगोडा पाटील इंग्लिश मेडियम स्कूल असे नामकरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीधर हेरवाडे होते.

प. पू. १०८ पावनसागजी महाराज म्हणाले की, पाठशाळांच्या माध्यमातून सुसंस्कृत विद्यार्थी घडले पाहिजेत. आजची तरुण पिढी बदलली आहे. त्यांना आपल्या संघटनेमध्ये जोडून घेऊन चांगले संस्कार देण्याची गरज आहे.

डी. के. पाटील यांनी स्वागत; तर शशिकांत राजोबा यांनी प्रास्ताविक केले. वीराचार्य स्मृती ग्रंथाचे संपादन एन. जे. पाटील यांनी केले.

यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, अध्यक्ष रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष दत्ता डोर्ले, डॉ. अजित पाटील, संजय शेटे, पा. पा. पाटील, शशिकांत राजोबा, भूपाल गिरमल, एन. जे. पाटील, सुभाष मगदूम, जि. प. सदस्या सुरेखा आडमुठे, मीनाक्षी पाटील, सरपंच विकास कदम, श्रीकांत पाटील, बबन थोटे आदी उपस्थित होते.

फोटो -२९दुधगाव१ -

ओळ - दुधगाव (ता. मिरज) येथे वीर सेवा दल संचलित बाबासाहेब नानगोडा पाटील इंग्लिश मेडियम स्कूल नामकरणप्रसंगी प. पू. पावनसागरजी महाराज, माजी खासदार राजू शेट्टी, रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील, डॉ. अजित पाटील, शशिकांत राजोबा, प्रा. डी. ए. पाटील, भूपाल गिरमल, एन. जे. पाटील उपस्थित होते.

Web Title: The contribution of Veer Seva Dal in the society is invaluable