शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंतच्या टोल वसुलीचा हिशेब द्या

By admin | Updated: November 22, 2014 00:04 IST

आयुक्त : महापालिकेचे ‘एमएसआरडीसी’ला पत्र

कोल्हापूर : शहरात ३० टक्क्यांपेक्षा कमी टोलवसुली होत आहे. त्यामुळे अपूर्ण कामे करण्यास ‘आयआरबी’ कंपनीने असमर्थता दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयआरबी’ची २५ कोटींची अनामत रक्कम जप्त करण्याची हालचाल महापालिकेने सुरू केली. आज, शुक्रवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे टोलचा संपूर्ण हिशेब देण्याची मागणी करीत दुसरा दणका दिला. या आधारे टोलवसुलीतून नुकसान होत असल्याचा ‘आयआरबी’चा दावा फोल ठरविण्याचा महापालिकेचा इरादा आहे. एकात्मिक रस्तेविकास प्रकल्पातील करारानुसार प्रलंबित व अपूर्ण कामे पूर्ण करावीत, असे १ आॅक्टोबर २०१४ रोजी महापालिकेने पत्राद्वारे ‘आयआरबी’ला कळविले होते. ही मागणी फेटाळत ‘आयआरबी’ने उद्दिष्टापेक्षा ३० टक्क्यांनी कमी टोलवसुली होत आहे. कृती समितीचे आंदोलन व नागरिकांतील रोष यांमुळे कामे करण्यास अडचणी येत आहेत. शहरातील या अपूर्ण कामांचा दर चार वर्षांपूर्वीच्या ‘डीएसआर’नुसार आहे. त्यामुळे रंकाळा-जुना वाशीनाक्यासह इतर कामे करणे सध्या तरी अशक्य असून, ही अपूर्ण कामे कंपनीने केलेल्या जादा कामाच्या खर्चातून महापालिकेनेच करावीत, असे ‘आयआरबी’ व्यवस्थापनाने १७ आॅक्टोबर २०१४ च्या पत्राद्वारे कळविले आहे. यानंतर महपालिकेने चार दिवसांपूर्वी नगरविकास सचिव श्रीकांत सिंह यांच्याकडे ‘आयआरबी’ ची २५ कोटींची अनामत रक्कम जप्त करण्याची विनंती केली होती.शहरात टोलवसुली सुरू झाल्यापासून आजअखेर किती वाहने शहरात आली व गेली, ‘आयआरबी’ने किती टोलवसुली केली, याचा सर्व हिशेब व माहिती देण्याची विनंती आयुक्तांनी रस्ते महामंडळाकडे केली आहे. महामंडळाने खरी व वेळेत माहिती दिल्यास ३० टक्केच टोलवसुली होत आहे, हा ‘आयआरबी’चा मुद्दा खोडून २५ कोटी अनामत रक्कम जप्तीचा मार्ग खुला होणार आहे. आयुक्तांच्या या दणक्याने ‘आयआरबी’ला शहरातील उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. (प्रतिनिधी)आठवड्यात दुसरा दणका‘आयआरबी’ची अनामत रक्कम जप्त करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. आता टोलवसुलीच्या हिशेबाच्या आधारे ‘आयआरबी’ला खोटे पाडण्याचा डाव महापालिकेने आखला आहे. टोलमुक्तीबाबत राज्य शासनाकडून हालचाली झाल्यास प्रकल्पाची किंमत ठरविण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. या प्रशासकीय खेळीमुळे आयआरबीची गोची होणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.