शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंच्या भाषणांवर येणार मर्यादा

By admin | Updated: July 27, 2016 00:39 IST

मंत्रीपदामुळे होणार अडचण : शासनावर टीका करणे होणार कठीण

प्रताप बडेकर -- कासेगाव--आक्रमक, रांगड्या व अस्सल गावरान भाषणाने सदाभाऊ खोत हे सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. भाजपने त्यांना घटकपक्षाच्या माध्यमातून मंत्री केल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आता मर्यादा पडणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘मुलुखमैदानी तोफ’ म्हणून उभ्या महाराष्ट्रात सदाभाऊ खोत प्रसिध्द आहेत. खा. राजू शेट्टी व सदाभाऊ या जोडीने पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठी मोठमोठी आंदोलने केली आहेत. गेल्या १५ वर्षांत त्यांनी साखरसम्राटांना सळो की पळो करुन सोडले आहे. त्यांच्यामुळेच उसाला चांगला दर मिळाला, हे वास्तव आहे. या ऊसदर आंदोलनाच्या माध्यमातून सदाभाऊंचा सर्वसामान्य व शेतकऱ्यांशी ऋणानुबंध निर्माण झाला. आक्रमक, रांगड्या भाषणशैलीमुळे त्यांनी भल्या-भल्यांना जेरीस आणले. पाठीमागे कोणतीही मोठी शक्ती नसताना, केवळ भाषणचातुर्यावरच त्यांनी राष्ट्रवादीचे मोठे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना खासदारकीच्या निवडणुकीत झुंजविले होते. अगदी अल्पमतात सदाभाऊ पराभूत झाले होते. या लढतीची चर्चा राज्यभर झाली.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आमदार अजित पवार, आमदार जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, आ. हसन मुश्रीफ आदी राजकीय नेत्यांवरील टीकेमुळे सदाभाऊ खोत यांना प्रसिध्दी मिळाली. मात्र आता सदाभाऊ राज्यात मंत्री झाल्याने त्यांच्या भाषणातून बोलण्यावर निर्बंध येणार आहेत. ऊसदराबाबत ते कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.ऊस दराच्या भूमिकेकडे लक्षराष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील व सदाभाऊ खोत यांच्यामध्ये ऊस दरासाठी संघर्ष झाला आहे. एफआरपी, ऊस दरासाठी जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक आंदोलने सदाभाऊंनी केली आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सदाभाऊ कृषिमंत्री झाले आहेत. त्यामुळे येथून पुढे ऊसदराच्या प्रश्नासाठी सदाभाऊ कोणती भूमिका घेणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे.