शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक, सामाजिक लोकशाही देणारे संविधान हाच खरा धर्मग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

सांगली : बुद्धीवर आधारित सांस्कृतिक आणि सामाजिक लोकशाही देणारे संविधान म्हणजेच देशाचा खरा धर्मग्रंथ असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. ...

सांगली : बुद्धीवर आधारित सांस्कृतिक आणि सामाजिक लोकशाही देणारे संविधान म्हणजेच देशाचा खरा धर्मग्रंथ असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन विशेषांकाच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेण्याचा माझा प्रवास’ या विषयावर त्यांनी विचार मांडले.

ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा हक्क देणारे संविधान हीच खरी जीवनप्रणाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर माहितीपट आणि नंतर चित्रपट बनविताना ते अधिकाधिक समजत गेले. त्यांना प्रत्यक्ष भेटलेल्या, सहवास लाभलेल्या व त्यांच्यासोबत कार्य केलेल्या व्यक्तींनी त्यांचे मोठेपण विविध अंगांनी सांगितले. सर्वसामान्य आंबेडकरी जनतेचे बाबासाहेबांवरील अलोट प्रेम व उत्साह अनुभवला. महिलांना बाळंतपणाची रजा देणारे, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज निर्माण करणारे, मजुरांना किमान वेतनासाठी आग्रह धरणारे बाबासाहेब काळाच्याही पुढे होते.

दरम्यान, या विशेषांकात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अजय कांडर, डॉ. शरद भुताडिया, राजकुमार तांगडे, अलका धुपकर, भरत यादव, नरेंद्र लांजेवार आदींचे लेखन समाविष्ट आहे.

प्रास्ताविक संपादक राजीव देशपांडे यांनी केले. आभार व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी मानले.