शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: July 8, 2016 01:01 IST

संभाजी पवार : साखर सम्राटांमुळे निर्माण होताहेत वाद

सांगली : शेतकरी संघटनांमुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे. अशावेळी या संघटनांमध्ये फूट पाडून बदनामी करून शेतकऱ्यांची पुन्हा गळचेपी करण्यासाठी काही साखरसम्राट सरसावले आहेत, अशी टीका माजी आमदार संभाजी पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही चळवळ खिळखिळी करण्याचे षड्यंत्र आहे. शरद जोशी, खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत, प्रा. शरद पाटील, हरिभाऊ खुजट, रघुनाथदादा पाटील, बाळासाहेब मासुले, संजय कोले, महावीर चव्हाण, बाबू काका सायमोते, एम. के. गुरव, बाळासाहेब कुलकर्णी यासारखे नेते शेतकरी चळवळीत अग्रभागी राहिले. ऊस, दूध यांचे दर, झोनबंदी यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी आंदोलने केली. त्यामुळे बळिराजाच्या जीवनात क्रांती घडली. दहा-बारा वर्षाच्या काळात ऊसदरवाढीच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना घामाचे ३२ हजार २५ कोटी रुपये शेतकऱ्यांना हक्काची व जादा रक्कम मिळाली. त्यासाठी शेतकरी नेत्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास, लाठीहल्ला सहन केला. चळवळीला इतका मोठा इतिहास असताना अचानक संघटनेअंतर्गत मतभेद वाढू लागले आहेत. या संघटनांनी साखरसम्राटांच्या या प्रयत्नांना बळी पडू नये. जोपर्यंत शेतकरी संघटना, शेतकऱ्यांसाठीची चळवळ जिवंत आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. साखरसम्राटांच्या बंदुकीला शेतकरी नेत्यांनी आपला खांदा द्यावा व त्या बंदुकीने दुसऱ्या शेतकरी नेत्यांवर निशाणा साधावा, ही गोष्ट दुर्दैवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शत्रूचा स्वार्थ साधला जाईल. व्यक्ती तितक्या प्रकृती या नैसर्गिक न्यायाने चळवळीतील नेते व संघटना अनेक असणे हे स्वभाविक आहे. मी या सर्वांचा आदर करतो. प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेले योगदान मोठे आहे. आपापसातील मतभेदांपेक्षा शेतकरी हित जोपासणे हेच ध्येय समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. या मार्गावर चालणाऱ्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना पाठबळ देऊ, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उसाला दर : संघटनांचे यशस्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली आहे. हे चळवळीला आलेले यश आहे, असे पवार म्हणाले. संघटनांचे हे यश साखर सम्राटांच्या पचनी पडत नसल्यामुळे ते संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत भांडण लावत आहेत. याला शेतकरी फसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.