शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, शिराळ्यात कॉँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: December 20, 2015 00:31 IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : भाजप सरकारने षड्यंत्र रचल्याचा आरोप

सांगली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांची बदनामी करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्हा व शहर जिल्हा कॉँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस भवनपासून स्टेशन चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, शिराळ्यात कॉँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले, भाजपने कॉँग्रेसविरोधात षड्यंत्र रचले असून, त्याचा निषेध करण्यासाठीच या मोर्चाचे आयोजन केले आहे. कॉँग्रेसचे सर्व कार्यकर्ते गांधी घराण्याच्या पाठीशी आहे. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजपकडून जाणीवपूर्वक कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी व विरोधी पक्षातील नेत्यांना सीबीआयच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम सुरु आहे. आपले अपयश लपवून ठेवण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले, भाजपला विरोधी पक्षच नको असल्याने त्यांनी विरोधी पक्षांची बदनामी सुरु केली आहे. यावेळी माजी आमदार हाफिज धत्तुरे, उमाजीराव सनमडीकर, विक्रम सावंत, आनंदराव मोहिते, इंद्रजित साळुंखे, सुभाष खोत, राजीव मोरे, दिलीप पाटील, रफिक मुजावर, अजित ढोले, राजन पिराळे, अजित दुधाळ, सतीश पाटील, सी. बी. पाटील, दिलीप बुरसे, मृणाल पाटील, बाळासाहेब गुरव, रावसाहेब माणकापुरे आदी सहभागी झाले होते. सागाव : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेसला नाहक बदनाम केले जात आहे. हे षड्यंत्र मोदी सरकारने रचले असून, काँग्रेस पक्षाला बदनाम करणाऱ्या भाजप वृत्तीचा निषेध व भाजपविरोधात निदर्शने शिराळा तालुका काँग्रेसच्यावतीने शनिवारी करण्यात आली. यावेळी बोलताना प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर हल्ला करण्याचा प्रयत्न भाजपप्रणित मोदी सरकारने सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाविरोधात सुडबुध्दीचे आरोप करून काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व युवा नेते राहुल गांधी यांना टार्गेट केले जात आहे. तसेच अन्य काँगे्रस नेत्यांनाही यामध्ये लक्ष्य केले आहे. या प्रवृत्तीचा निषेध करावा तितका थोडा आहे. तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाला त्यागाची, बलिदानाची परंपरा असताना, भाजपसारखा जातीयवादी पक्ष लोकांमध्ये गैरसमज निर्माण करुन बदनाम करत आहे. यावेळी संपतराव देशमुख, के. डी. पाटील, तानाजी जाधव, सत्यजित पटील, दादा नलवडे आदी अपस्थित होते. (वार्ताहर)