Sangli: संजय परांजपे खून प्रकरणाची सखोल चौकशी करा, सुत्रधाराचा शोध घ्या; उदय परांजपे यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 19:18 IST2026-03-23T19:17:56+5:302026-03-23T19:18:32+5:30

आणखी कोणाचा सहभाग याचा शोध घ्या

Conduct a thorough investigation into the Sanjay Paranjape murder case, find the culprit Uday Paranjape demands | Sangli: संजय परांजपे खून प्रकरणाची सखोल चौकशी करा, सुत्रधाराचा शोध घ्या; उदय परांजपे यांनी केली मागणी

Sangli: संजय परांजपे खून प्रकरणाची सखोल चौकशी करा, सुत्रधाराचा शोध घ्या; उदय परांजपे यांनी केली मागणी

पलूस : पलूस शिक्षण संस्थेचे संचालक संजय परांजपे यांच्या खुनाच्या मागे अल्पवयीन युवकाव्यतिरिक्त आणखी कोणती शक्ती आहे काय? या खुनाचा खरा मास्टर माइंड मोकाट रहायला नको. तो जगासमोर आलाच पाहिजे. या खुनाची निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी मृत संजय परांजपे यांचे बंधू उदय परांजपे यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन युवकास गुन्हेगार समजून खुनाचा तपास थांबवू नये, अशी मागणी केल्याने परांजपे खून प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

शिक्षण संस्था संचालक संजय परांजपे खून प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित अल्पवयीन युवकाने खुनाची कबुली पोलिसांना दिली असली तरी एक युवक इतका क्रूर व निर्दयी हत्या कशी करू शकतो. या पाठीमागे अजून कोण आहेत काय? याची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी परांजपे कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

परांजपे कुटुंबाच्या मते या दुःखद घटनेमुळे आमच्या कुटुंबाचे कधीही न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. संजय कधीच परत कधीही येणार नाही हे जरी माहिती असले तरी खुनातील खरे चेहरे समाजापुढे येऊन त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. त्यामुळे पोलिसांनी अजून या प्रकरणाची सखोल चौकशी करून यात सहभागी असणाऱ्या व अल्पवयीन युवकास पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर कारवाई केलीच पाहिजे अशी ठाम मागणी उदय परांजपे व कुटुंबीय यांनी केली आहे.
उदय परांजपे यांनी म्हटले की, संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी अद्याप अनेक बाबींचा उलगडा झालेला नाही. या खुनाचे इतर पैलू उघड होणे अत्यंत गरजेचे आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पलूस परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी होत आहे. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, असेही उदय परांजपे यांनी स्पष्ट केले.

संशयित कोणाकडे आला होता

पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित अल्पवयीन युवक रात्री वेळाने कोणाकडे व का आला होता. त्याने त्याच दिवशी सोबत हत्यार कसे आणले होते. तो खून करून जिन्याखाली एकटा मृतदेह लपवून कसा ठेवू शकतो. यासह काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे या खुनामागे कोण आहे काय? याचा कसून तपास करण्याची मागणी होत आहे.

Web Title : सांगली: परांजपे हत्याकांड की गहरी जांच हो, सूत्रधार ढूंढो: उदय परांजपे

Web Summary : उदय परांजपे ने संजय परांजपे की हत्या की गहन जांच की मांग की, गिरफ्तार नाबालिग से परे एक मास्टरमाइंड होने का संदेह है। अनुत्तरित प्रश्न न्याय और सभी शामिल पार्टियों को उजागर करने की मांग को बढ़ावा देते हैं। पलुस में डर का माहौल है।

Web Title : Sangli: Paranjape murder demands deeper probe, find mastermind: Uday Paranjape

Web Summary : Uday Paranjape seeks thorough investigation into Sanjay Paranjape's murder, suspecting a mastermind beyond the arrested minor. Unanswered questions fuel demands for justice and uncovering all involved parties. Fear grips Palus.