शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीवरून दोन्ही कॉँग्रेसचे वस्त्रहरण

By admin | Updated: December 20, 2015 00:32 IST

महापालिका सभा : आर्थिक व्यवहारांवरून एकमेकांवर चिखलफेक, दबाव गट हवेतच विरला

सांगली : महासभेतील गोंधळ नवीन नसला तरी, सत्ताधारी कॉँग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादीला एकाचवेळी स्वकीयांनी घरचा आहेर देण्याची घटना प्रथमच घडली. आर्थिक तडजोड केल्याचा आरोप करून काही सदस्यांनी स्वकीयांवरच चिखलफेक केल्याने भरसभेत दोन्ही कॉँग्रेसचे वस्त्रहरण सर्वांनी अनुभवले. महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी महापौर विवेक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत गोंधळ झाला. गोंधळाबरोबरच एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचा खेळही याठिकाणी रंगला होता. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे वस्त्रहरण केले. त्याचबरोबर विरोधकांचे एका विरोधी नगरसेवकाने आणि सत्ताधाऱ्यांचे एका सत्ताधारी नगरसेवकाने वस्त्रहरण केले. सभेतील गोंधळाबरोबरच हा राजकीय गोंधळही सर्वांना धक्कादायक होता. सभेकडे तटस्थपणे पाहणाऱ्या काही नगरसेवकांचे डोके या राजकारणाने चक्रावले. गोंधळात सभा गुंडाळण्यात येत असताना सत्ताधारी गटाला त्यांचेच सदस्य असलेले संजय मेंढे यांनी धारेवर धरले. चुकीच्या पद्धतीने सभेचे कामकाज चालविले जात असल्याची टीका त्यांनी केली. मेंढे यांनी वित्त आयोगाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जोर धरला होता. महापौरांनी त्यांची मागणी झिडकारली. मेंढे यांना स्वत:च्या प्रभागात ६० लाखांची कामे अपेक्षित होती. ३० लाखांची कामे मंजूर केल्यानंतरही त्यांचा व्यक्तिगत स्वार्थासाठी आणखी आणखी ३० लाखांचा हट्ट होता, असा आरोप महापौरांनी पत्रकारांशी बोलताना केला. मेंढे यांनीही महापौरांना याबाबतचे पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. आर्थिक हितासाठी नव्हे प्रभागातील जनतेच्या प्रश्नांसाठी आपण भांडत असल्याचा दावा मेंढे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. सत्ताधाऱ्यांच्या तंबूला मेंढेंच्या रूपाने आग लागली असतानाच, विरोधी गटातही शुभांगी देवमाने व आनंदा देवमाने यांच्या रूपाने टीकेचा बॉम्ब पडला होता. देवमाने दाम्पत्याने विरोधी पक्षसुद्धा सत्ताधाऱ्यांना मॅनेज झाल्याचा आरोप केला. सभा गुंडाळण्यामागे दोन्ही पक्षांची मिलीभगत आहे. एकमेकांचे हितसंबंध गुंतल्यानेच विषयपत्रिकेवरील विषयांची चर्चा होऊ दिली नाही, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. दोन्ही पक्षांना मिळालेला हा घरचा आहेर महापालिकेत दिवसभर चर्चेत होता. चांगल्या कामांसाठी दबाव आणण्याचा दावा करणारा सर्वपक्षीय दबावगटही हवेतच विरला. सदस्यांच्या भूमिकांविषयीच गोंधळ दिसून आला. (प्रतिनिधी)