शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

खोकीधारकांना ८७ वर्षांची हमी

By admin | Updated: March 13, 2015 23:55 IST

धोरणात्मक त्रुटी : २९ वर्षांचा करार; २३ गाळ्यांच्या प्रकरणात अपिलाऐवजी कायम करारपत्र

अविनाश कोळी - सांगली - गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला खोकी पुनर्वसन कराराचा वाद आता संपुष्टात आला आहे. महापालिकेने २९ वर्षांचा करार केला असून पुन्हा तीनवेळा कराराचे नूतनीकरण करून ८७ वर्षांची हमी देण्यात आली आहे. २३ गाळेधारकांशी महापालिकेने कायमस्वरुपी पुनर्वसनाचा करार केला आहे. भाडेपट्टी, करारपत्र आणि पुनर्वसनाबाबत ठोस धोरण निश्चित नसल्याने भविष्यात खोकी पुनर्वसनात अडचणी होण्याची चिन्हे आहेत. येथील जुन्या स्टेशन चौकात महापालिकेचे ४२0 गाळे उभारण्यात आले आहेत. एका इमारतीमधील गाळ्यांचे पूर्ण वाटप झाले असले तरी, दुसऱ्या इमारतीमधील गाळ्यांचे वाटप अद्याप झालेले नाही. गाळेवाटप आणि पुनर्वसनाच्या धोरणात महापालिकेने अनेक चुका केल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. तरीही याबाबत कोणतेही धोरण निश्चित झाले नाही. खोकीधारकांनी कायमस्वरुपी पुनर्वसनाची मागणी केली होती. कायद्यातील तरतुदीनुसार ९९ वर्षांचा करार करता येत नसल्याची अडचण महापालिकेने सांगितल्यानंतर खोकीधारकांनी गाळे २९ वर्षांच्या कराराने देण्याची मागणी केली. त्यावरही बराच संघर्ष झाला. आता २९ वर्षांचे करारपत्र करतानाही त्यात अनेक त्रुटी दिसून येत आहेत. भाडेपट्टी आणि घरपट्टी अशा दुहेरी कराचा बोजा खोकीधारकांवर लादू नये, म्हणून सभेत चर्चाही झाली होती. प्रत्यक्षात त्याबाबतचे स्पष्ट धोरण अजूनही निश्चित केलेले नाही. वार्षिक किंवा पंचवार्षिक भाडेवाढ होणार का, ती किती असेल, हस्तांतर करण्यास परवानगी मिळणार का, असे अनेक प्रश्न अजूनही निरुत्तरीत आहेत. सभागृहात चर्चेची औपचारिकता पार पाडण्यात आली आहे. धोरणांच्या अधांतरी झुल्यावर गाळेधारक आणि महापालिका झुलत आहे.

अपीलच केले नाही
स्टेशन चौकातील २३ खोकीधारकांनी गाळे कायमस्वरुपी मिळावेत म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेने या प्रकरणात योग्य पद्धतीने बाजू मांडली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. तरीही खोकीधारकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी अपिलाची संधी असतानाही महापालिकेने अपील न करता त्यांच्याशी कायमस्वरुपी करारपत्र केले. दुसरीकडे अन्य जवळपास चारशे खोकीधारक कायमस्वरुपी पुनर्वसनाची मागणी करत असताना, त्यांना झिडकारण्यात आले. आता समान न्याय तत्त्वावर अन्य खोकीधारकही न्यायालयात जातील म्हणून २९ वर्षांचा करार करताना ८७ वर्षांची तोंडी हमी त्यांना देण्यात आली आहे.


गाळेवाटपातही घाटा
सांगलीच्या स्टेशन चौकातील दुसऱ्या इमारतीमधील गाळेवाटपाचा निर्णय होऊनही त्यांचा ताबा लाभार्थ्यांना दिला नाही. त्यामुळे वर्षभर कर गोळा होऊ शकला नाही. यातही प्रशासकीय बेशिस्तपणाच दिसून आला. खोकी प्रश्नावर इतका गोंधळ होऊनही याप्रकरणी कोणतेही ठोस धोरण घेतले गेले नाही. त्यामुळेच भविष्यात खोकीधारकांना आणि महापालिकेला धोरणातील त्रुटींचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

ज्या अधिकाऱ्यांमुळे २३ गाळ्यांचा हक्क महापालिकेला गमवावा लागला, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कायदा विभाग असतानाही अपील न करता महापालिकेने संबंधित गाळेधारकांशी करारपत्र केले आहे. समान न्याय तत्त्वावर अन्य खोकीधारकही कायमस्वरुपी पुनर्वसनाबाबत आग्रही राहू शकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर भविष्यात आणखी मोठ्या प्रश्नाला महापालिकेस तोंड द्यावे लागेल.
- गौतम पवार, नगरसेवक