शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्राची राज्यभर वाताहत

By admin | Updated: September 6, 2015 23:15 IST

आनंदराव आडसूळ : सहकारी बँक कर्मचारी मेळाव्यात टीका

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र हे राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्याच ताब्यात आहे. परंतु त्या सहकार क्षेत्राची सध्या वाताहत सुरू आहे, अशी टीका बॅँक एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष आणि खासदार आनंदराव आडसूळ यांनी केली. येथील मराठा समाज कार्यालयात रविवारी सहकारी बॅँकेतील कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील उपस्थित होते. खा. आडसूळ म्हणाले, विविध बॅँकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असून, कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या घामाला दाम तसेच सन्मान मिळालाच पाहिजे. परंतु तसे होत नसेल तर प्रसंगी न्यायासाठी बाह्या वर सरकल्या तरी हरकत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांनी नेहमी बॅँकेतील सभासदांचे प्रतिनिधी म्हणून कार्यशील राहिले पाहिंजे. कर्मचारी हा बॅँकेची प्रामाणिकपणे सेवा करतो. साहजीकच त्यांच्या हक्काचे दाम त्याला मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु कित्येक ठिकाणी ते होताना दिसत नाही. त्यामुळेच संघटनांची आवश्यकता आहे. सहकार चळवळीतून सामान्यांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, ही संकल्पना आपल्या मनात पक्की बसली पाहिजे व त्यानुसारच संचालक मंडळांचा व्यवहार असणे अपेक्षित आहे. आपली जिल्हा बॅँक नियमानुसार चालली नसल्यामुळेच त्यावर प्रशासक नेमण्यात आला होता. परंतु प्रशासक असतानाही बॅँकेचे कामकाज कर्मचाऱ्यांनीच भक्कमपणे सांभाळले होते. ज्यांच्यामुळे बॅँक अवसायक बनली, त्यांनाच पुन्हा सभासदांनी निवडून दिले आहे. हीच परिस्थिती राज्यातही इतरत्र दिसते. ती दुर्दैवी असल्याचेही आडसूळ यांनी सांगितले. डी. के. पाटील म्हणाले की, बॅँक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी वारंवार आपण आवाज उठविला आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी कर्मचाऱ्यांनी नेहमी संघर्ष केला पाहिजे, परंतु त्याचवेळी संचालकांचादेखील आदर केला पाहिजे. कर्मचाऱ्यांनी कधीही स्वाभिमानाला तिलांजली देऊ नये. यावेळी कार्यक्रमास संघटनेचे कार्याध्यक्ष नरेंद्र सावंत, सरचिटणीस प्रदीप पाटील, चंद्रशेखर गवळी, पदाधिकारी, सहकारी संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)देण्या-घेण्याला महत्त्व!पूर्वी बॅँकेत नोकरी हवी असेल तर ‘नाती-गोती’ उपयोगाला येत होती. सध्या मात्र देण्या-घेण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ही वस्तुस्थिती कोणीच नाकारु शकत नाही. मुळात नोकरी हवी असेल तर पैसे कशाला लागतात, हे अनाकलनीय कोडे आहे, असे मत खा. आडसूळ यांनी यावेळी व्यक्त केले.