शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यात बंद

By admin | Updated: February 23, 2015 00:15 IST

निेषेध फेऱ्या : संशयितांच्या अटकेची आंदोलनकर्त्यांकडून मागणी, कुंडलमध्ये मूक मोर्चा

सांगली : श्रमिक, कष्टकऱ्यांचा आधारवड आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यात आज (रविवारी) विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला. निषेधफेरी, मूकमोर्चा काढून संशयितांच्या अटकेची मागणी करण्यात आली.
इस्लामपूर : गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज इस्लामपूर शहरात बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार सायंकाळपर्यंत बंद होते. पानसरे यांच्या हत्येचा निषेध व हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आज विविध पक्ष, संघटना व परिवर्तनवादी चळवळींनी बंदची हाक दिली होती. आजचा रविवारचा आठवडा बाजारही सायंकाळनंतर भरला.
वाळवा : वाळव्यात आज उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. सरपंच गौरव नायकवडी, उपसरपंच अपर्णा साळुंखे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पानसरे यांना आदरांजली वाहिली. आज वाळवा, शिरगाव, नागठाणे, पडवळवाडी, सूर्यगाव, अहिरवाडी येथे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
कवठेमहांकाळ : कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ पकडावे, अशी मागणी करत कवठेमहांकाळ शहरातून आज शेकडो पुरोगामी कार्यकर्त्यांनी शहरातील मल्लिकार्जुन मंदिरापासून निषेध फेरी काढली. यावेळी प्रा. दादासाहेब ढेरे, नामदेवराव करगणे, सफाई कर्मचारी संघटनेचे दादासाहेब झुरे, साधना कांबळे, बाळासाहेब रास्ते, सुभाष कोष्टी आदींची भाषणे झाली. किशोर वाघमारे, रा. बा. संकपाळ, बबूताई वाघमारे, अंकुश रास्ते, हणमंत माने, सुनील वाघमारे, प्रा. बाबासाहेब भेंडे, अनिल लोंढे ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
कडेगाव : गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी कडेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती दल, आरपीआय, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. कडेगावसह अन्य गावांमध्येही बंद पाळण्यात आला.
दिवसभर कडेगाव येथील दुकाने तसेच बाजारपेठ बंद होती. कडेगाव येथील बसस्थानक चौकात सुरेश देशमुख, सुरेश निर्मळ, जीवन करकटे यांनी आदरांजली वाहिली. श्रमिक मुक्ती दलाचे मोहनराव यादव यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला. कडेपूर, चिंचणी येथे गोविंदराव पानसरे यांना आदरांजली वाहण्यात आली.
तासगाव : पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुकारलेल्या बंदला तासगावात प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंदच होती. रस्त्यांवर शुकशुकाट होता. सायंकाळी ५ नंतर काही ठिकाणी दुकाने सुरु करण्यात आली. मुख्य चौकात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. बंद शांततेत पाळण्यात आला.
कवठेएकंद : कवठेएकंद येथे गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी कवठेएकंदमध्ये बंद पाळण्यात आला. जुनी चावडी येथे सर्वपक्षीयांतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रा. बाबूराव लगारे, प्रा. विजय कोगनोळे, सूर्यकांत पाटील, राजाराम माळी, अशोक घाईल, उत्तम कांबळे, दीपक जाधव, संतोष आठवले, सरपंच शरद लगारे, कॉ. वसंत कदम, किसना शिरतोडे, बी. डी. तपासे, वसंत तपासे यांनी पानसरेंच्या हत्येचा निषेध केला. निषेध फेरीत शंकरराव माळी, सिराज मुजावर, जयवंत माळी, प्रदीप कांबळे, दत्तात्रय पुजारी, अशोक माळी, प्रवीण घाईल, सहभागी झाले होते.
शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना कार्यस्थळावर पानसरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कारखान्याचे संस्थापक संचालक रंगराव बाळाजी पाटील (रा. कोळे) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, संचालक पोपटराव जाधव, अशोकराव थोरात, बाबासाहेब महिंंद, अ‍ॅड. उत्तमराव पाटील, संग्राम पाटील, अजित पाटील, अनुप पाटील, बाळासाहेब पाटील, पांडुरंग मेटकरी, प्र. कार्यकारी संचालक अशोकराव नलवडे, सेक्रेटरी उदय मोरे, तात्यासाहेब मोहिते उपस्थित होते.
पलूस : कॉ. गोविंद पानसरे यांना कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसह परिवर्तनवादी आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. ज्येष्ठ प्रबोधक व्ही. वाय. पाटील, कॉ. मारुती शिरतोडे यांची भाषणे झाली.
किर्लोस्करवाडी : कॉ. गोविंद पानसरे यांना रामानंदनगर येथे विविध संघटनांतर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी व्ही. वाय. पाटील, अख्तर पिरजादे, संदीप नाझरे, बी. बी. खोत, शहाजी चव्हाण, प्रा. उध्दवराव सदामते, आदम पठाण, राजाभाऊ माने, अकबर पठाण, गणपतराव सावंत, हंबीरराव मोरे, उत्तम सुतार, संतोष गायकवाड, सुहास वड्डीकर उपस्थित होते. (वार्ताहर)

एन. डी. पाटील यांना संरक्षणाची मागणी
कुंडल येथे सर्वपक्षीयांच्यावतीने रविवारी प्रमुख मार्गावरुन मूक मोर्चा काढून ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येचा निषेध करण्यात आला. खारगे चौकात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. गावातील सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले. शोकसभेत क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र लाड, सर्जेराव पवार, कॉ. शहाजी पवार, महादेव लाड, मारुती शिरतोडे यांची भाषणे झाली. ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही यावेळी शोकसभेत करण्यात आली. श्रीकांत जाधव, हिंमतराव पवार, कॉ. अर्जुन बोबडे, डॉ. व्ही. डी. पाटील, अ‍ॅड. दीपक लाड, विश्वास जाधव, मोहन लाड, पोपटराव सूर्यवंशी, श्रीकांत माने, नंदकुमार लाड, सचिन आवटे उपस्थित होते.