शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

‘डोंगराई’ला गुराख्यांचा विळखा

By admin | Updated: August 23, 2015 23:38 IST

वृक्षांचे नुकसान : वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नागरिकांत नाराजी

नंदकुमार मोहिते ल्ल तोंडोली महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे शक्तीस्थळ असलेले कडेपूर (ता. कडेगाव) येथील डोंगराई देवीचे तीर्थक्षेत्र गुराख्यांच्या विळख्यात सापडले आहे. डोंगरावरील झाडांचे गुराख्यांमुळे मोठे नुकसान होत असून, याकडे वनविभागानेही दुर्लक्ष केले आहे. कडेगावच्या दक्षिण दिशेला असलेल्या डोंगरावर डोंगराई देवीचे प्राचीन मंदिर असून, श्रावण महिन्यात मंगळवार व शुक्रवार तसेच नव्याची पौर्णिमा या दिवशी मोठी जत्रा भरते व भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळते. कडेगाव-पलूसचे आमदार व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या डोंगराई मंदिर व परिसरास पर्यटस्थळाचा दर्जा मिळवून देऊन कोट्यवधींचा निधी मिळवून दिला. त्यांच्या वनखात्याच्या कारकीर्दीत या शेकडो एकराच्या डोंगरावर हजारो वृक्षांची लागवड केली. ही लागवड करताना झाडांना शेणखत टाकून रोपे लावल्यामुळे वाढ चांगली झाली. परंतु सध्या या सर्व वृक्षलागवडीची विल्हेवाट सुरूझालेली पहावयास मिळते. कडेगाव, कडेपूर, हिंगणगाव, तडसर आदी गावांतील गुराखी खुलेआम या डोंगरावर गुरे चारण्यासाठी येत आहेत. चरण्यासाठी आलेल्या गुरांकडून खूप मोठ्या प्रमाणावर बहरू लागलेल्या रोपांवर व छोट्या झाडांवर हानी पोहोचत आहे. काही गुराख्यांकडून या छोट्या झाडांवर कुऱ्हाडही चालवली जात आहे. मुळाशी काही कुऱ्हाडीचे घाव घातले जातात व आठ-दहा दिवसांनी ते झाड वाळले की जळणासाठी नेले जात आहे. डोंगराई परिसराला गुराख्यांचा विळखा पडत आहे. परंतु निद्रिस्त अवस्थेत असलेल्या वनविभागाला मात्र त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याचे पहावयास मिळते. वृक्षांवर प्रेम करणारे परिसरातील सर्व वृक्षमित्र व श्री डोंगराई देवी तीर्थक्षेत्रावर अढळ श्रद्धा असणाऱ्या सर्व भाविकांमधून गुराख्यांच्या दुष्कृत्याबद्दल संतप्त भावना आहेत. वन विभागाने रोपांची व वृक्षांची नासाडी करणाऱ्या जनावरांना व त्यांना घेऊन येणाऱ्या गुराख्यांना या परिसरात यायला मज्जाव करावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.