शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून सार्वजनिक विहिरीची स्वच्छता

By admin | Updated: September 3, 2015 23:49 IST

दुंडगे येथील तरुणांचा पुढाकार : लाखाचा खर्च अपेक्षित; निधीची मागणी

गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत मारुती मंदिरासमोरील सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्याचे काम लोकवर्गणी व लोकसहभागातून सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत गावातील तरुण कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. या कामासाठी दीड लाखांचा खर्च अपेक्षित आहे.यावर्षी पावसाने ओढ दिल्याने गावात पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून तरुण कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. याकामी गावकऱ्यांनी सढळ हस्ते मदतीचा हात दिला आहे. गाळ काढण्यासाठी अंदाजे ५० हजार आणि संरक्षक जाळीसळ विहीर दुरुस्तीसाठी सुमारे एक लाखाचा खर्च अपेक्षित आहे.या मोहिमेत संतोष देसाई, मंजुनाथ मदकरी, विजय संकपाळ, नाईक, सुजित संकपाळ, राजेंद्र सुतार, राजेंद्र जडे, सोमनाथ पाटील, अमित पाटील, अक्षय पाटील, संजय केंगार, आप्पासाहेब सावंत, मारुती दंडगीदास, सुनील खवरे, राजेंद्र पाटील, मारुती पायमल्ली, भैरू नाईक, दुंडाप्पा पाटील, आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मंडल अधिकारी विकास जाधव, तलाठी राजश्री पचंडी, सरपंच रूपाली दावणे, उपसरपंच डॉ. काशिनाथ संकेश्वरी यांनी विहिरीस भेट देऊन सार्वजनिक कामातील सहभागाबद्दल या तरुणांचे विशेष कौतुक केले. (प्रतिनिधी)१०० वर्षांपूर्वीची विहीर---१९१२ मध्ये गांधीवादी कार्यकर्ते मा. ना. कुलकर्णी यांनी ही विहीर स्व:खर्चाने बांधली आणि गावकऱ्यांसाठी खुली केली. त्याकाळी निम्मे गाव याच विहिरीवर अवलंबून होते. गावात नळ योजना झाल्यानंतर या विहिरीकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आठ ते दहा फुटांचा गाळ विहिरीत साचला आहे. गाळ काढण्यासह विहिरीच्या दुरुस्तीसाठी टंचाई योजनेतून भरीव निधी मिळावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.