शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत उंच गणेशमूर्तींवर भर

By admin | Updated: September 22, 2015 23:29 IST

सजावट व देखावे पाहण्यासाठी गर्दी : कमानी, कारंजे, विविध प्रतिकृती

मिरज : मिरजेतील गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, भव्य गणेशमूर्तींची स्थापना, कमानी, कारंजे, विविध प्रतिकृती असे देखावे साकारले आहेत. यावर्षी मंडळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या जिवंत देखाव्यांऐवजी उंच गणेशमूर्तींची स्थापना केली आहे. सांगलीवेस गणेशोत्सव मंडळाने ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ हा देखावा केला आहे. मंडळाने उभारलेल्या कमानीवर राजमाता जिजाऊंसह सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या प्रतिमा आहेत. उदगाव वेस येथील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाने शोले चित्रपटातील ‘गब्बर’ या व्यक्तिरेखेवर विनोदी देखावा साकारला आहे. वीरशैव कक्कय्या समाज गणेश मंडळाने बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविले आहे. ब्राह्मणपुरीतील विश्व चौक गणेशोत्सव मंडळाची २२ फूट उंच खंडोबाची मूर्ती आहे. देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. तानाजी चौक गणेश मंडळाने राधाकृष्ण रूपातील उंच गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. २५ फूट लांब व कुंभार खण येथील कृष्णेश्वर गणेश मंडळाची तांडव नृत्य करणाऱ्या गणेशाची २१ फूट उंचीची गणेशमूर्ती आहे. वीरभद्र मंडळाचा बैलावर आरूढ शंकराचा देखावा आहे. ब्राह्मणपुरीतील भारतमाता व मंगळवार पेठेतील कुंकुवाले गणेश मंडळाने आकर्षक संगीत रोषणाई केली आहे. मंगळवार पेठेतील गजराज मंडळाची चांदीची गणेशमूर्ती व शिवाजी चौक मंडळाची १८ फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती आहे.कनवाडकर हौद येथील शिवगर्जना मंडळाने १९ फूट उंच सिंहासनारूढ गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. कर्मवीर चौकातील महागणपती मंडळाने २० फूट उंच गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. काही मंडळांनी प्रबोधनपर साकारलेले देखावे खुले होण्यास सुरुवात झाल्याने रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे. यावेळी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)सामाजिक देखाव्यांंना बगल  --मिरजेतील गणेश मंडळांची सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांची परंपरा आहे. मात्र यावर्षी देखाव्यांऐवजी अनेक मंडळांच्या मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती आहेत. उंच गणेशमूर्ती, विविध मंदिरांच्या प्रतिकृती, सजावटीसह आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. पाहण्यासाठी गर्दी होत आहे.