शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रुपडे बदलून महापालिकेचे सांगलीत नवे सभागृह सज्ज

By admin | Updated: December 30, 2014 23:26 IST

नव्या वर्षाची नवलाई : जानेवारीतील महासभेचे नियोजन

सांगली : महापालिकेच्या रुपडे पालटलेल्या नवीन सभागृहाचे काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्यातील सभेसाठी आता ते सज्ज झाले आहे. किरकोळ कामे व स्वच्छतेसाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागणार असून, नव्या वर्षात हे सभागृह नव्या रुपात महापालिकेच्या सेवेत रुजू होणार आहे. महापालिकेचे रुपडे बदलण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. नूतनीकरणाचा खर्च आता एक कोटीच्या घरात गेला आहे. महापालिका आयुक्त कार्यालय, प्रतीक्षा कक्ष, सभागृह, घड्याळ, आवार अशा सर्व गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही कामे निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. हे काम रेंगाळले. आता सरत्या वर्षाअखेरीस कामे पूर्ण होत आली असून नव्या वर्षात सभागृहासह आयुक्त कार्यालय, प्रतीक्षा कक्ष तसेच अन्य सुविधा उपलब्ध होणार आहे. नव्या वर्षातील पहिली सभा रुपडे बदललेल्या सभागृहात होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. महापालिकेच्या सभागृहातील छत, आसनव्यवस्था, खिडक्या, पंखे अशा सर्व गोष्टी बदलल्या आहेत. डागाळलेल्या भिंतींची जागा आता नव्याने रंगवलेल्या व गुळगुळीत भिंतींनी घेतली आहे. कोळीष्टकांनी भरलेल्या छताला आता प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा साज चढविण्यात आलेला आहे. अरुंद खिडक्या आणि दरवाजांमुळे अंधारात असलेल्या सभागृहाला नैसर्गिकरित्या प्रकाशमय करणाऱ्या मोठ्या खिडक्या बसविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)