Sangli: चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी; धरणात किती टीएमसी पाणीसाठा.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:12 IST2025-06-28T17:12:21+5:302025-06-28T17:12:34+5:30

शिराळा : शिराळा शहरासह तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी सुरू ...

Chandoli Dam is 66 percent full due to heavy rains in the dam area in sangli | Sangli: चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी; धरणात किती टीएमसी पाणीसाठा.. जाणून घ्या

Sangli: चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी; धरणात किती टीएमसी पाणीसाठा.. जाणून घ्या

शिराळा : शिराळा शहरासह तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने चांदोली धरण ६६ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. तालुक्यातील सहा मोठे प्रकल्प तसेच सर्व ४९ पाझर तलाव भरले आहेत. कोकरुड - रेठरे बंधारा पाण्याखाली गेले आहेत.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळे येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यावर्षी पाथरपुंजबरोबर निवळे येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. तसेच अकरा वेळा अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रुक तलाव, रेठरे धरण, मोरणा धरण, टाकवे तलाव, शिवणी तलाव तसेच सर्व ४९ पाझर तलाव भरले आहेत. गिरजवडे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा स्थिर आहे. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत. सागाव येथील वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून, स्मशान भूमी पाण्याखाली आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, धनगरवाडा, चांदोली येथे दमदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गतवर्षी १०.९० टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी २२.६९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरणात ६ हजार ५२३ क्युसेकने आवक, तर वीजनिर्मिती केंद्रातून १७३५ क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. दि. २३ मेपासून आजअखेर १२.२५ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये असा..

  • कोकरूड ८.५०(४८६.९० )
  • शिराळा ०(२४३.४०)
  • शिरशी ४.३० (३६८.९०)
  • मांगले ३ (२३६.२० )
  • सागाव ३.८० (२५४.२०)
  • चरण २४.००(७०९.६० )
  • वारणावती - ३९ (८८४)


चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस -

  • पाथरपुंज - ८३(१६३२)
  • निवळे - ६५ (१५४६)
  • धनगरवाडा - ५० (९११)
  • चांदोली - ३२ (९०१)


गतवर्षी २७ जूनअखेरचा एकूण पाऊस

  • चांदोली धरण - ३५६
  • पाथरपुंज - ८७७
  • निवळे - ६२८
  • धनगरवाडा -३६१

Web Title: Chandoli Dam is 66 percent full due to heavy rains in the dam area in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.