शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससमोर गटबाजीचे आव्हान

By admin | Updated: September 24, 2015 23:52 IST

संजयकाकांशी टक्कर : पलूस-कडेगाव मतदारसंघातील चित्र

किरण सावंत - किर्लोस्करवाडी -विजयाचा षट्कार ठोकणाऱ्या डॉ. पतंगराव कदम यांच्यासमोर आता पलूस-कडेगावच्या विकासाबरोबरच पक्षातील गटबाजी मोडून काढण्याचे प्रमुख आव्हान आगामी वर्षात असणार आहे. गावागावात असणाऱ्या अंतर्गत गटबाजीला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. डॉ. कदम यांनी पलूस-कडेगावचा विकास गेल्या १५ वर्षांत चांगल्याप्रकारे केला आहे, पण आगामी वर्षात सत्ता नसताना विरोधी बाकावर बसून विकासकामांची गती कायम ठेवण्याची जबाबदारी कदम यांच्यावर असणार आहे. डॉ. कदम यांनी या मतदारसंघात विकासकामांची गंगा आणली आहे, असे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात. सलग १५ वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून विकासकामांबरोबर शैक्षणिक, उद्योग, सामाजिक क्षेत्रात पलूस-कडेगाव मतदारसंघाचा कायापालट केला आहे. यापुढे मात्र विरोधी बाकावर असताना विकासाची गती कायम ठेवण्याची जबाबदारी डॉ. कदम यांच्याकडे आहे. यावेळी विकासकामांबरोबर पलूस तालुक्यातील गावागावात असणारी अंतर्गत गटबाजीही त्यांना थोपवावी लागणार आहे.पलूस तालुक्यातून खासदारकीसाठी संजयकाका पाटील यांनीही चांगली मते घेतली होती. तालुक्यात भाजपची ताकद वाढलेली आहे. पृथ्वीराज देशमुख यांनाही आगामी काळात चांगले पद देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे.संग्रामसिंह देशमुख यांनीही पलूस तालुक्याकडे आता विशेष लक्ष दिले आहे. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामुळे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आदी पक्षांचा सामना करत असताना काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान आहे. क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद लाड यांनी राष्ट्रवादी पक्ष पुन्हा ताकदीने वाढविण्यास सुरुवात केली आहे. ही गटबाजी संपवण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी लागेल. अन्यथा पुढील काळात हीच गटबाजी डॉ. कदम यांना अडचणीची ठरू शकते. आगामी पलूस नगरपरिषदेत सत्ताकेंद्रे कशी एकवटतात; याकडे संपूर्ण लक्ष लागून राहिले आहे. पलूसमधील काँग्रेसअंतर्गत गट-तट, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्वांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.एकंदरीत सत्ता ताब्यात नसताना सत्तेबाहेर राहून विकासासाठी निधी आणणे, सूतगिरणी, शैक्षणिक व्याप सांभाळून दुसरीकडे अंतर्गत गटबाजी संपवून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, डॉ. विश्वजित कदम, महेंद्र लाड, स्थानिक नेतेमंडळी यांची साथ बहुमोल ठरणार आहे. जिरवाजिरवीची भाषा महागात पडणार पलूस तालुक्यातील ३४ गावांपैकी काही गावात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. काँग्रेससंदर्भात असणारी जिरवाजिरवीची भाषा मोडून काढण्यात डॉ. कदम कितपत यशस्वी होतात, यावरच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाची ताकद कळणार आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.