शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

सभापती काँग्रेसचा, उपसभापती घोरपडेंचा!

By admin | Updated: August 27, 2015 23:14 IST

बाजार समिती : संतोष पाटील, जीवन पाटील यांची निवड

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीवरून निर्माण झालेल्या वादात गुरुवारी अखेर जत तालुक्याने बाजी मारली. काँग्रेसचे संतोष पाटील यांची सभापतीपदी, तर भाजपमधील अजितराव घोरपडे गटाचे जीवन पाटील यांची उपसभापतीपदी गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला. बाजार समितीच्या निवडणुकीत पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील रयत आघाडीने १९ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या. व्यापारी गटातील दोन संचालकांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीत सभापती पदासाठी संतोष पाटील यांचा अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जाला सूचक दीपक शिंदे, तर अनुमोदक रामगोंडा संती होते. उपसभापती पदासाठी अजितराव घोरपडे समर्थक जीवन पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला सूचक अभिजित चव्हाण, तर अनुमोदक कुमार पाटील होते. दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकर पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, विक्रम सावंत, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील यांनी नूतन सभापती, उपसभापतींचा सत्कार केला. सत्कारावेळी घोरपडे म्हणाले की, बाजार समिती निवडणुकीत राजकीय ईर्षा होऊ नये, याची आम्ही दक्षता घेतली. गटा-तटाचा विचार न करता उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याच्या विचाराने आम्ही एकत्र आलो. भविष्यात बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. शेतीमालावर प्रक्रिया व त्याची विक्री व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आहे. सांगलीतील शेतीमालाला राज्य व जागतिक पातळीवर पोहोचवून चांगला दर मिळवून देण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जातील. (प्रतिनिधी)मदन पाटील अनुपस्थितसभापती, उपसभापती निवडीला माजी मंत्री व संचालक मदन पाटील गैरहजर होते. ते प्रकिया गटातून निवडून आले आहेत. पण त्यांना मतदानाचा अधिकार नाही. अशातच ते गैरहजर राहिल्याने निवडीवेळी त्याची चर्चा सुरू होती. रयत आघाडीच्या नेत्यांनी बहुमताने सभापतीपदी निवड केली आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बाजार समितीचा कारभार करू. कोणताही डाग लागणार नाही, याची दक्षता घेऊ. बाजार समितीचा कारभार पारदर्शी करण्यावर भर असेल.- संतोष पाटील, सभापतीमाझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पदाची संधी मिळाली आहे. वसंतदादांनी स्थापन केलेल्या या बाजार समितीची शान आम्ही कायम राखू. नेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी व शेतमालाचा विकास करण्यावर भर राहील.- जीवन पाटील, उपसभापती