शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्यांच्या उत्पादनात ६० टक्के घट

By admin | Updated: September 6, 2015 23:13 IST

दुष्काळाचा फटका : अन्य पिकांवरही परिणाम शक्य; वर्षभर दर तेजीतच राहण्याची शक्यता

अशोक डोंबाळे - सांगली  पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील उडीद, मूग, तुरीच्या उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांनी घट होणार आहे. याच परिस्थितीचा खरिपाच्या इतर पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. कडधान्य उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील पिके पूर्णत: वाळून गेली आहेत. परिणामी वर्षभरात कडधान्यांचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर तब्बल महिनाभराच्या खंडानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी भागातील खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. रिमझिम, तुरळक व हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून होत राहिला. परंतु त्याचा उत्पादनासाठी फारसा उपयोग झाला नाही. खरिपातील बहुतांशी पिके सध्या फुलोऱ्यात अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. पिकांची ही अवस्था महत्त्वपूर्ण समजली जाते. चार-पाच दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास दाणे भरले जाणार नाहीत अथवा दाणे भरल्यास ते बारीक राहतील. त्याचा परिणाम वजनावर पर्यायाने उत्पादनावर होणार आहे. गतवर्षी उडीद-मुगाचे हेक्टरी उत्पादनाचे उद्दिष्ट ८२७ किलो असताना प्रत्यक्षात ते ४१२ किलो झाले होते. यंदा उद्दिष्ट ८२७ किलो अपेक्षित आहे. परंतु, ते सुमारे ४५० ते ५०० किलो एवढेच होईल, असे मत सूत्रांनी व्यक्त केले. सलग तीन वर्षे जिल्ह्यातील कडधान्याच्या उत्पादनात घट होत चालल्याचे कृषी विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यंदा तृणधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट प्रती हेक्टरी २५६०, गळीत धान्याचे १५०० किलो अपेक्षित आहे. मात्र ते साध्य होणार नाही. पावसाने पीकवाढीच्या व आता दाणे पक्वतेच्या टप्प्यावर ओढ दिल्याने उत्पादनाची सरासरीही गाठणे कठीण होणार असून, शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका सोसावा लागेल, असा अंदाज आहे.कृषी विभागाकडून पीकनिहाय उत्पादनात होणाऱ्या घटीचा आढावा घेतला जात आहे. अर्थात येत्या चार-पाच दिवसात पाऊस झाल्यास घट होण्याच्या प्रमाणात घट होईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील कडधान्यांच्या पेरणीत तीन वर्षात झालेली घट (क्षेत्र हेक्टरमध्ये)