शिराळा तालुक्यास केंद्रीय कमिटीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:59+5:302021-04-11T04:26:59+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यास केंद्रीय कमिटीने कोरोनाबाबत चाललेल्या कामाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असून, तालुक्यात सुरू असलेल्या कामाबाबत ...

Central Committee visits Shirala taluka | शिराळा तालुक्यास केंद्रीय कमिटीची भेट

शिराळा तालुक्यास केंद्रीय कमिटीची भेट

शिराळा

: शिराळा तालुक्यास केंद्रीय कमिटीने कोरोनाबाबत चाललेल्या कामाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असून, तालुक्यात सुरू असलेल्या कामाबाबत या कमिटीने समाधान व्यक्त केले.

डॉ. प्रलयकुमार वर्मा यांच्या कमिटीने शिराळा उपजिल्हा रुग्णालय, कोविड सेंटर, अंत्री बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र , निगडी उपकेंद्र याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली.

यामध्ये कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, जेवण, उपजिल्हा रुग्णालयात दाखल १० कोरोना रुग्णांची विचारपूस, प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेले ऑक्सिजन बेड, लसीकरण याचबरोबर निगडी येथे करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोन याची पाहणी केली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद कोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. गणेश राजमाने, डॉ. नितीन जाधव, डॉ. स्वप्नील पवार, डॉ. संतोष पाटील, दीपक चिलवन उपस्थित होते.

चौकट- १

Web Title: Central Committee visits Shirala taluka