मिशीला कट न मारल्याने सलून दुकानदारावर ब्लेडने वार, संशयित तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 18:48 IST2022-07-13T18:47:57+5:302022-07-13T18:48:29+5:30

‘थोडा वेळ थांब. एक गिऱ्हाईक करतो’ म्हटल्याने रागावलेल्या सोहेलने दगड मारून दुकानात खुर्चीच्या मागे लावलेला आरसा फोडला. याची विचारणा केल्यानंतर जाधव यांना ‘तू माझ्या मिशीला कट का मारला नाहीस’, असे म्हणत सोहेलने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण केली.

Blade stabs saloon shopkeeper for not cutting mustache, charges filed against suspected youth in miraj | मिशीला कट न मारल्याने सलून दुकानदारावर ब्लेडने वार, संशयित तरुणावर गुन्हा दाखल

संग्रहित फोटो

मिरज : मिरजेत खाजा बस्ती येथे सलून दुकानात मिशीला कट मारला नसल्याच्या कारणावरून तरुणाने सलून दुकानदारावर ब्लेडने वार केले. यावेळी सलून दुकानातील काच दगडाने फोडून नुकसान करण्यात आले.

खाजा वसाहतीत शंभरफुटी रस्त्यावर चॉईस हेअर कटिंग या सलून दुकानात मिशी कट करण्यासाठी गेलेल्या चुआ ऊर्फ सोहेल सोलकर या तरुणाने सलून व्यावसायिक अर्जुन गाविंद जाधव याच्यावर ब्लेडने वार करून दगडाने मारहाण केली.

अर्जुन जाधव (रा. गुरुवारपेठ मिरज) यांचे खाजा वसाहतीत सलून दुकान आहे. या दुकानात सोहेल ऊर्फ चुआ निजाम सोलकर गेला होता. सोहेल याने त्याच्या मिशीला कट मारण्यास अर्जुन जाधव याना सांगितले. अर्जुन जाधव यांनी ‘थोडा वेळ थांब. एक गिऱ्हाईक करतो’, असे सांगितले. यामुळे रागावलेल्या सोहेलने दगड मारून दुकानात खुर्चीच्या मागे लावलेला आरसा फोडला.

याची विचारणा केल्यानंतर जाधव यांना ‘तू माझ्या मिशीला कट का मारला नाहीस’, असे म्हणत सोहेलने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण केली. हातातील ब्लेडने जाधव यांच्या हातावर वार करून डाव्या हाताचा चावा घेतला. यावेळी पळून जाताना बाहेर पडलेला दगड जाधव यांच्याकडे फेकल्याने दगड हाताला लागल्याची तक्रार त्यांनी गांधी चौक पोलिसात दिली आहे. याबाबत सोहेल सोलकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Blade stabs saloon shopkeeper for not cutting mustache, charges filed against suspected youth in miraj