शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात राष्ट्रवादीच्या बंडखोरांना भाजपचे बक्षीस

By admin | Updated: September 25, 2015 00:08 IST

नगरपालिका : भाजपच्या सत्तेत आबा गटाचा सहभाग कायम?

दत्ता पाटील - तासगाव -तासगाव नगरपालिकेतील आबा गटाच्या तीन शिलेदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापैकी एकाला नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागली, तर अन्य चार नगरसेवकांनी राष्ट्रवादीत राहून भाजपच्या नव्या नगराध्यक्ष निवडीसाठी रसद पुरवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बंडखोर नगरसेवकांना भाजपकडून सत्तेचे बक्षीस मिळणार का, याची उत्सुकता आहे. भाजपच्या सत्तेत राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा सहभाग कायम राहण्याची शक्यता असून, विद्यमान उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांचे उपनगराध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता आहे.तासगाव नगरपालिकेत महिन्याभरात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. भाजपच्या व्यूहरचनेमुळे राष्ट्रवादी पुरती नामोहरम झाली. राष्ट्रवादीच्या पाठबळावर नगराध्यक्ष असणाऱ्या संजय पवार यांना भाजपच्या खेळीमुळे पायउतार व्हावे लागले, तर राष्ट्रवादीतील तीन नगरसेवकांना भाजपमध्ये खेचून तसेच अन्य पाच नगरसेवकांना पक्षाच्या नेत्यांविरोधात निर्णय घ्यायला भाग पाडून खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी केली, किंंबहुना तासगाव नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया साधली. खासदार पाटील यांनी केलेल्या खेळीत आबा गटाचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी आवश्यक मॅजिक फिगर जुळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांची आवश्यकता होती. त्यामुळे खासदार पाटील यांनी तीन नगरसेवकांना पक्षात घेऊन, तर अन्य चार नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून सत्तेचे सिंंहासन ताब्यात घेतले.राष्ट्रवादीतील चार बंडखोर नगरसेवकांमध्ये विद्यमान उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोर नगरसेवकांमुळेच भाजपचा नगराध्यक्ष बदलाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे भाजपकडून या नगरसेवकांना सत्तेचे बक्षीस मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपकडून पहिल्यांदा सुशिला साळुंखे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत थोरात यांना कायम ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच उर्वरित कालावधितही राष्ट्रवादीच्या बंडखोर नगरसेवकांनाच संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नेत्यांचा आदेश झुगारलातालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्षाची तटबंदी उभी राहिली असली तरी, नगरपालिकेच्या राजकारणात पक्षांच्या नेत्यांचा आदेश झुगारून का होईना, राष्ट्रवादी आणि भाजपची एकत्रित सत्ता राहण्याची शक्यता दिसून येत आहे.४खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी केली, किंंबहुना तासगाव नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया साधली.खासदार पाटील यांनी केलेल्या खेळीत आबा गटाचा वाटा महत्त्वाचा मानला जात असल्याची चर्चा आहे.