चंद्रकांत पाटील यांनी अन्याय केल्यानेच भाजपला रामराम, शिवाजीराव नाईकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:25 PM2022-03-31T17:25:23+5:302022-03-31T17:26:43+5:30

आपल्याबरोबर शिराळा तालुक्यातील ४८ हजार पक्ष सदस्यांनी भाजपचा राजीनामा दिला. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षाचे सदस्य सामुदायिक राजीनामा देत असतील, तर ही गोष्ट पक्षाला विचार करायला लावणारी.

BJP's resignation due to injustice done by Chandrakant Patil, Serious allegations of Shivajirao Naik | चंद्रकांत पाटील यांनी अन्याय केल्यानेच भाजपला रामराम, शिवाजीराव नाईकांचा गंभीर आरोप

चंद्रकांत पाटील यांनी अन्याय केल्यानेच भाजपला रामराम, शिवाजीराव नाईकांचा गंभीर आरोप

googlenewsNext

शिराळा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील संबंध टिकवण्यासाठी राजकीय खेळी करून हेतुपुरस्सर आमच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ४८ हजार कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. शनिवारी (दि.२) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा येथे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.

येथील यशवंत ग्लुकोज कारखान्याच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुका भाजपचे अध्यक्ष सुखदेव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, सागर नाईक, उत्तम पाटील, पांडुरंग गायकवाड, विजय महाडिक, शरद गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाईक म्हणाले की, २०१४ पासून आपण भाजपची पक्षबांधणी केली. शिराळा तालुक्याचा उत्तर भाग, मेणी खोरे, वाळवा तालुक्याचा पश्चिम भाग येथील शेती पाण्यासाठी वाकुर्डे बुदुक योजना, डावा कालवा यासाठी निधी द्यावा यासाठी तसेच आमच्या संस्था अडचणीत आल्या. याबाबत आम्ही सतत सहकार्य करावे, अशी मागणी करत होतो; मात्र आम्हाला भाजपने फक्त खेळवत ठेवले.

ते म्हणाले की, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाकुर्डे सिंचन योजना व डाव्या कालव्यासाठी आवश्यक निधी दिला आहे. त्यामुळे येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. संस्था सुरू होणार असल्याने स्थानिक नागरिकांना रोजगार मिळणार आहे. चांदोली पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

४८ हजार सदस्यांचा सामुदायिक राजीनामा

शिवाजीराव नाईक यांनी सांगितले की, आपल्याबरोबर शिराळा तालुक्यातील ४८ हजार पक्ष सदस्यांनी भाजपचा राजीनामा दिला. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षाचे सदस्य सामुदायिक राजीनामा देत असतील, तर ही गोष्ट पक्षाला विचार करायला लावणारी आहे. हेतुपुरस्सर आमच्यावर गेल्या काही वर्षात अन्याय करण्यात आल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP's resignation due to injustice done by Chandrakant Patil, Serious allegations of Shivajirao Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.