Sangli ZP: भाजपला नाकारलं, तरीही सत्तेत घुसण्याचा प्रयत्न; पराभवाची सवय करून घ्यावी, विशाल पाटील यांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:25 IST2026-03-09T15:23:32+5:302026-03-09T15:25:19+5:30

जनतेने दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी सत्तेसाठी धडपड सुरू आहे. एवढे सत्तेचे प्रेम का आहे, हे समजत नाही

BJP leaders should get used to defeat says MP Vishal Patil | Sangli ZP: भाजपला नाकारलं, तरीही सत्तेत घुसण्याचा प्रयत्न; पराभवाची सवय करून घ्यावी, विशाल पाटील यांनी लगावला टोला

Sangli ZP: भाजपला नाकारलं, तरीही सत्तेत घुसण्याचा प्रयत्न; पराभवाची सवय करून घ्यावी, विशाल पाटील यांनी लगावला टोला

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीत लोकांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणे नाकारले आहे. तरीही सत्तेत शिरण्याचा भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची टीका खासदार विशाल पाटील यांनी रविवारी सांगलीत केली. “जनतेने दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी सत्तेसाठी धडपड सुरू आहे. एवढे सत्तेचे प्रेम का आहे, हे समजत नाही, भाजपने आता पराभवाची सवय लावून घ्यावी,” असा टोला त्यांनी लगावला.

सांगली जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खासदार विशाल पाटील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. पाटील म्हणाले, भाजपला जिल्हा परिषदेत २० जागाही निवडून आणता आल्या नाहीत. जनतेने नाकारले असतानाही सत्तेत सहभागी होण्यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

मात्र, लोकशाहीत जनतेचा कौल सर्वांत मोठा असतो आणि तो मान्य करणे प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. सांगलीत भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. तरीही सत्तेच्या समीकरणात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसते. “जनतेने दिलेला निर्णय स्वीकारण्याची राजकीय प्रगल्भता असावी. 

वाचा: सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच : चंद्रकांत पाटील; व्हिपबाबत केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण 

सत्तेत राहण्याची सवय लागली की, विरोधी बाकांवर बसणे अवघड जाते, पण लोकशाहीत हा प्रवास प्रत्येक पक्षाला करावा लागतो. महापालिकेत जे काही राजकीय समीकरण पाहायला मिळाले, तसे चित्र जिल्हा परिषदेत दिसणार नाही," असा दावा करत त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मतदारांनी आपला स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे सत्तेसाठी कोणतेही अनैसर्गिक प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.

यापुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्येही भाजपला अशाच प्रकारच्या पराभवांना सामोरे जावे लागेल. भाजपने आता पराभवाची सवय लावून घ्यावी. जनतेच्या निर्णयाचा आदर करून विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title : सांगली ZP: बीजेपी की सत्ता हथियाने की कोशिश की आलोचना।

Web Summary : विशाल पाटिल ने जनता द्वारा खारिज किए जाने के बावजूद सांगली ZP में सत्ता हासिल करने के बीजेपी के प्रयासों की आलोचना की। उन्होंने बीजेपी को हार स्वीकार करने और जनादेश का सम्मान करने की सलाह दी, और भविष्य में भी नुकसान की भविष्यवाणी की।

Web Title : Sangli ZP: BJP's attempt to grab power despite rejection criticized.

Web Summary : Vishal Patil criticizes BJP's attempts to gain power in Sangli ZP despite public rejection. He advises BJP to accept defeat gracefully and respect the public mandate, forecasting continued losses in future elections.