मोठी बातमी: पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा सांगलीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:35 IST2026-01-20T10:35:42+5:302026-01-20T10:35:53+5:30

Govind Pansare Murder Case Suspect Death: कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाड याचा सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

Big news: Sameer Gaikwad, the main suspect in the Govind Pansare murder case, dies in Sangli | मोठी बातमी: पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा सांगलीत मृत्यू

मोठी बातमी: पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा सांगलीत मृत्यू

 सांगली : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड, ( वय 45, रा. विकास चौक, सांगली) याचा आज दि. 20 जानेवारी) सकाळी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात भाऊ आणि पत्नी आहे. त्याला प्रत्येक रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी होती. तो सांगलीतील विश्रामबाग पोलीस हजेरी देत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याला काल मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

समीर गायकवाड हा गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. 

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा.l 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकहून परतत असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी उमाताई पानसरे देखील जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे समीर गायकवाड यासह दहा जणांना  एसआयटीने अटक केली होती.

Web Title : गोविंद पानसरे हत्याकांड: मुख्य संदिग्ध समीर गायकवाड की सांगली में मौत

Web Summary : गोविंद पानसरे हत्याकांड के मुख्य संदिग्ध समीर गायकवाड का सांगली में दिल का दौरा पड़ने से निधन हो गया। वह 2017 से जमानत पर बाहर थे। गायकवाड को 2015 में पानसरे और उनकी पत्नी की 2015 में हुई गोलीबारी में शामिल होने के संदेह में गिरफ्तार किया गया था।

Web Title : Govind Pansare murder case: Key suspect Sameer Gaikwad dies in Sangli

Web Summary : Sameer Gaikwad, key suspect in Govind Pansare murder, died in Sangli due to a heart attack. He was out on bail since 2017. Gaikwad was arrested in 2015, suspected of involvement in the 2015 shooting of Pansare and his wife.