सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठवड्यात भरदिवसा तीन घरफोड्या करून तब्बल ४७ तोळे सोने चोरणाऱ्या आष्टी तालुक्यातील 'भोसले टोळी'तील एका आरोपीला सांगली व आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
आष्टी तालुक्यातील कासारी येथील संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय २५) याने दोन साथीदारांच्या मदतीने सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलिस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी आणि इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीत एक अशा एकूण तीन घरफोड्या केल्या होत्या. पोलिसांनी १०० किलोमीटरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आरोपींना ओळखले. आरोपींनी वापरलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीच्या कबुलीवरून सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आष्टी तालुक्यात पोहोचले.
मंगळवारी रात्री त्यांनी कासारी येथील पारधी वस्तीवर जाऊन संतोष भोसले याला बेड्या ठोकल्या. या टोळीतील मोहन निकाळजे-भोसले हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून, अतुल नवनाथ भोसले हा फरार आहे. या तिघांविरुद्ध शिराळा आणि इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद भुतेकर यांच्या पथकाने ही यशस्वी संयुक्त कारवाई केली.
Web Summary : Sangli police arrested one member of the 'Bhosale Gang' from Ashti, accused of stealing 47 tolas of gold in three daylight burglaries. The arrest followed a joint operation and analysis of CCTV footage. Two other gang members are either in custody or remain at large.
Web Summary : सांगली पुलिस ने आष्टी से 'भोसले गिरोह' के एक सदस्य को गिरफ्तार किया, जिस पर दिनदहाड़े तीन चोरियों में 47 तोला सोना चुराने का आरोप है। गिरफ्तारी संयुक्त अभियान और सीसीटीवी फुटेज के विश्लेषण के बाद हुई। गिरोह के दो अन्य सदस्य या तो हिरासत में हैं या फरार हैं।