शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांच्या प्रभागात प्रतिष्ठेची लढाई

By admin | Updated: November 17, 2016 23:17 IST

तासगाव पालिका निवडणुकीत कुरघोड्या : उट्टे काढण्यास विरोधक सरसावले; प्रचारात चढाओढ

दत्ता पाटील ल्ल तासगाव तासगाव नगरपालिकेच्या दहा प्रभागातील निवडणुकीचा फड सध्या चांगलाच रंगात आला आहे. २१ जागांवर निवडणूक होत असली तरी, प्रस्थापित उमेदवारांच्या लढतीकडे अवघ्या तासगावकरांचे लक्ष केंद्रित झाले आहे. पारंपरिक विरोधकांत होत असलेली लढत, पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण, जातीय समीकरण आणि प्रस्थापित नगरसेवकांच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. या निवडणुकीत जुने उट्टे काढण्यासाठी प्रतिस्पर्धी सरसावले असून, प्रचारात चांगलीच चढाओढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तासगाव नगरपालिका निवडणुकीत दहा प्रभागांतून २१ जागांसाठी लढत होत आहे. काही प्रभागांत तिरंगी, तर काही प्रभागांत बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी प्रचाराच्या यंत्रणेने रंग भरला आहे. मात्र काही प्रभाग जुन्या-नव्या समीकरणांमुळे विशेष लक्षवेधी ठरत आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपमधील प्रस्थापित माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील आणखी एकदा नशीब अजमावत आहेत. या ठिकाणी त्यांच्याविरोधात सातत्याने लढत देणारे राष्ट्रवादीचे अभिजित माळी पुन्हा एकदा विरोधात उभे ठाकले आहेत. बाबासाहेब पाटील यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच भाजपांतर्गत गटबाजीतून कुरघोडी करण्यासाठीदेखील एका गटाने या ठिकाणी लक्ष केंद्रित केल्याची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले अरुण साळुंखे भाजपकडून रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपचे प्रस्थापित पदाधिकारी माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांचा पत्ता कट करुन, या ठिकाणी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या जाफर मुजावर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याठिकाणी राष्ट्रवादी सोडल्यामुळे आबाप्रेंमींनी चांगलीच मोट बांधली आहे, तर अविनाश पाटील यांच्या नाराजीची चर्चा जोर धरत आहेत. मुजावर पालिकेच्या राजकारणातील प्रस्थापित असल्याने हा प्रभागही लक्षवेधी ठरत आहे. प्रभाग क्रमांक नऊमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी उज्ज्वला पवार, तर त्यांचे पारंपरिक विरोधक भाजपचे दिग्विजय पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या ठिकाणची लढतही उत्सुकतेचा विषय ठरत आहे. तसेच प्रभाग दहामध्ये माजी नगरसेविका अनुराधा पाटील यांचे दीर सचिन पाटील राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. हा प्रभाग शहरातील सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागात तीन उमेदवार आहेत. त्यामुळे या प्रभागांच्या लढतीकडे अवघ्या तासगावकरांचे लक्ष लागून राहिले असून, या प्रभागांतून सुरु असलेली प्रचार यंत्रणा एकमेकांवर कुरघोडी करत चढाओढीने कार्यरत असल्याचे चित्र आहे. या प्रभागांतील लढती सर्वच उमेदवारांसाठी अस्तित्वाच्या ठरल्या आहेत. राजेंद्र म्हेत्रे यांचा पत्ता केला कट प्रभाग चारमध्ये भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र म्हेत्रे यांचा पत्ता कट करुन राजकारणात नवख्या असणाऱ्या किशोर गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागाबाबतही कुतूहल निर्माण झाले आहे. प्रभाग पाचमध्ये भाजपचे प्रस्थापित उमेदवार तत्कालीन उपनगराध्यक्ष अनिल कुत्ते रिंगणात आहेत.