सांगली : महाआवास अभियानात बलवडी (ता. खानापूर) ग्रामपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनाही अकोला येथील कामगिरीबद्दल पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. सातारा येथे शुक्रवारी (दि. १५) पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे.
मनोज जाधव यांनी अकोला जिल्हा परिषदेत ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्तीस असताना प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. अकोला जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. या कामगिरीबद्दल जाधव यांना गौरविण्यात येणार आहे.
बलवडी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य पुरस्कृत आवास योजनेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. याबद्दल सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. महाआवास अभियान २०२३-२४ अंतर्गत पुरस्कारासाठी या निवडी करण्यात आल्या आहेत. साताऱ्यात सैनिक स्कूलमध्ये सकाळी ११ वाजता पुरस्कार सोहळा सुरू होणार आहे.
Web Summary : Balwadi Gram Panchayat secured third rank in the MahaAwas Abhiyan. Manoj Jadhav will also be awarded for his work in Akola. The award ceremony will be held in Satara.
Web Summary : महाआवास अभियान में बलवडी ग्राम पंचायत ने तीसरा स्थान प्राप्त किया। मनोज जाधव को अकोला में उनके काम के लिए सम्मानित किया जाएगा। पुरस्कार समारोह सतारा में होगा।