पणुब्रे येथे बाप-लेकीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:30 IST2021-08-19T04:30:44+5:302021-08-19T04:30:44+5:30

कोकरुड : पणुब्रे वारुण (ता. शिराळा) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीमध्ये बाप-लेक जखमी झाले. याप्रकरणी दोघांवर कोकरूड पोलिसांत ...

Baap-leki beaten at Panubre | पणुब्रे येथे बाप-लेकीला मारहाण

पणुब्रे येथे बाप-लेकीला मारहाण

कोकरुड : पणुब्रे वारुण (ता. शिराळा) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीमध्ये बाप-लेक जखमी झाले. याप्रकरणी दोघांवर कोकरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्काताई मारुती पवार यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवारी (दि. १७) सायंकाळी आठच्या सुमारास मारुती पवार यांनी दारातील कुत्र्याला हाकलले. यावेळी शेजारी राहणाऱ्या शुभम शंकर पवार व तेजस शंकर पवार यांना मारुती पवार यांनी आपल्याच कुत्र्याला हाकलले, असा गैरसमज झाला. त्यातून राग आल्याने दोघांनी मारुती पवार व त्यांची मुलगी प्रियांका यांंना मारहाण केली तसेच भांडण सोडविण्यास आलेल्या मारुती पवार यांच्या पत्नी आक्काताई व लहान मुलगी अंजू यांना शिवीगाळ करण्यात आली. शुभम व तेजस यांच्यावर बुधवारी कोकरुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Baap-leki beaten at Panubre