शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती सभापतीपदी अविनाश पाटील

By admin | Updated: August 27, 2015 23:16 IST

तासगावमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष : उपसभापतीपदी सतीश झांबरे बिनविरोध

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अविनाश पाटील यांची, तर उपसभापतीपदी सतीश झांबरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपनिबंधक शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाली होती. सातशे कोटीहून अधिक उलाढाल असणाऱ्या या बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. निवडीपूर्वी संचालकांच्या झालेल्या बैठकीत सभापती पदासाठी अविनाश पाटील यांचे, तर उपसभापती पदासाठी सतीश झांबरे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या निवडीच्या कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याहस्ते सभापती, उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक अजितराव जाधव, धनाजी पाटील, संपतराव सूर्यवंशी, राजाराम पाखरे, रवींद्र पाटील, जयसिंग जमदाडे, दिनकर पाटील, साहेबराव पाटील, नवनाथ मस्के, लक्ष्मण पाटील, पुष्पा पाटील, रंजना पाटील, कुमार शेटे यांच्यासह स्मिता पाटील, युवराज पाटील, हणमंत देसाई, तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. चिंंचणी आणि डोंगरसोनी येथेही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (वार्ताहर)आबांच्या नावाने बेदाणा मार्केटचा विस्तारआमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली. मतदारांनी मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. मतदारांचा हा विश्वास यापुढील काळात सार्थ ठरवला जाईल. आर. आर. आबांच्या नावाने विस्तारित बेदाणा मार्केटचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याला प्राधान्य राहील. तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समितीवर सभापती म्हणून काम करण्याची संधी आमदार सुमनतार्इंनी दिलेली आहे. सर्व संचालकांनी एकमताने सभापती आणि उपसभापतींची निवड केली आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून पारदर्शी कारभार करू, असा विश्वास बाजार समितीचे नूतन सभापती अविनाश पाटील यांनी व्यक्त केला.