Sangli Crime: चिमुकली अंगणातून अचानक गायब झाली, कराडमध्ये सापडली, अपहरणाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:31 IST2026-02-10T17:31:14+5:302026-02-10T17:31:29+5:30

कौटुंबिक वादातून घटनेचा संशय; बालिका कराडमध्ये पोलिसांना सापडली

Aryansi Prakash Chavan a child from Karve Sangli district who suddenly disappeared from the yard, was found in Karad | Sangli Crime: चिमुकली अंगणातून अचानक गायब झाली, कराडमध्ये सापडली, अपहरणाचा संशय

Sangli Crime: चिमुकली अंगणातून अचानक गायब झाली, कराडमध्ये सापडली, अपहरणाचा संशय

ऐतवडे बुद्रूक : कार्वे (ता. वाळवा) येथील आर्यन्सी प्रकाश चव्हाण या पाच वर्षांच्या बालिकेला बिबट्याने नेल्याच्या शक्यतेने रविवारी रात्री व सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वनविभाग, पोलिस, रेस्क्यू टीमने बिबट्याच्या शक्यतेने शोध मोहीम राबवली. मात्र, सोमवारी दुपारी कराडमध्ये ती मुलगी कुरळप पोलिसांना सापडली. दरम्यान, या मुलीला कराडमध्ये कोणी नेले? याचे गूढ अद्याप उलगडले नसून रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास सुरू होता.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आर्यन्सी प्रकाश चव्हाण ही बालिका आपल्या आजोळी राहते. आजोबा कृष्णात पाटील यांचे घर शेतामध्ये आहे. रविवारी सायंकाळी ती अंगणात खेळत होती. आर्यन्सीची आई शिवानी ही तिला अंगणात जेवण भरवत होती. त्यावेळी पाणी आणण्यासाठी आई घरामध्ये गेली असता चिमुकली अंगणातून अचानक गायब झाली. घर शेतात असल्यामुळे व बऱ्याच वेळा परिसरात बिबट्या दिसल्यामुळे आर्यन्शीला बिबट्याने नेले असल्याचा संशय आला.

त्यानंतर पोलिस पाटील यांनी तातडीने वन विभाग व पोलिसांना कळवले. वन विभाग, पोलिस, रेस्क्यू टीम यांनी रात्री दीड वाजेपर्यंत ड्रोनच्या साह्याने परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र, मुलगी सापडली नाही. सोमवारी सकाळीही साडेसात वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत वन विभागाने शोध मोहीम राबवली. मात्र, चिमुकली कुठेही सापडली नाही. त्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार वनविभागाने शोधमोहीम थांबवली. दरम्यान, पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे या कुटुंबामध्ये अंतर्गत कलह असल्याचा अंदाज बांधला. त्या अनुषंगाने शोध मोहीम राबवून कराड येथून आर्यन्शीला शोधून काढले. सध्या आर्यन्शी कुरळप पोलिसांच्या ताब्यात असून, तिला कोणी पळवून नेले याबद्दलचे गूढ कायम होते. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.

सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत शोध मोहीम

बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याच्या संशयाने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. वन विभाग, रेस्क्यू टीम, महसूल विभाग, पोलिस विभाग यांनी काल रात्री दोनपर्यंत तर सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत शोध मोहीम राबवली.

आर्यन्शी चव्हाण ही बालिका कराडमध्ये सापडली आहे. सध्या ती आमच्या ताब्यात आहे. तपास सुरू असून, लवकरच घटनेचा उलगडा केला जाईल. - विक्रम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, कुरळप पोलिस स्टेशन

Web Title : सांगली: बच्ची गायब, कराड में मिली; अपहरण का संदेह

Web Summary : पांच वर्षीय आर्यांशी चव्हाण आंगन से लापता हो गई, तेंदुए के हमले का डर था। वह कराड में मिली। पुलिस को अपहरण का संदेह है। जांच जारी है।

Web Title : Sangli Girl Missing, Found in Karad; Suspect Kidnapping

Web Summary : Five-year-old Aryanshi Chavan disappeared from her yard, sparking fears of a leopard attack. She was found in Karad. Police suspect kidnapping. Investigation ongoing.