शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

वेरळा विकास संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण दत्ताजीराव चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण दत्ताजीराव चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुली डॉ. जाई व वसुंधरा असा परिवार आहे.

कवठेपिरानमध्ये जन्मलेल्या अरुण चव्हाण यांनी शिक्षणानंतर काही काळ औरंगाबादला डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात व कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून काम केले होते. त्यानंतर सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. यादरम्यान, खानापूर तालुक्यातील दुष्काळी शेतीशी त्यांचा संपर्क आला. पावसाअभावी नुकसानीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेतून वेरळा विकास संस्थेची स्थापना केली. स्वयंसेवी संस्थेची संकल्पना फारशी अस्तित्वात नसल्याच्या काळात म्हणजे २ ऑक्टोबर १९६९ रोजी वेरळा संस्थेचा शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रवास सुरू झाला. या प्रवासात त्यांना सदुभाऊ गुळवणी, भगवानराव सव्वाशे, धोंडिराम जाधव, रामतात्या जाधव यांची साथ मिळाली.

संस्थेने शेतकऱ्यांसाठी ३७ नाला बंधारे, दोन पाझर तलाव, १०४ एकर क्षेत्रात वनीकरण, रस्ते, शाळा अशी कामे उभी केली. देशिंग व खरशिंग परिसरात वनीकरण, कवठेपिरानला क्षारपड विकास असे प्रकल्प राबवले. शालाबाह्य मुलांसाठी घरबांधणी प्रशिक्षण केंद्र, महिला व मुलींसाठी वेगवेगळे प्रकल्प, आरोग्यासाठीची कामे चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून केली आहेत. एडस्‌ग्रस्तांसाठीही त्यांनी अनेक वर्षे काम केले.

संस्थेच्या कामांमुळे आळसंद, वाझर, कमळापूर, खानापूर आदी भागात हिरवाई फुलली आहे. कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.