Sangli: रुग्णालयातून महागडे नळ चोरणाऱ्यास अटक, चोरीच्या नव्या प्रकाराने पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:35 IST2025-02-20T18:34:22+5:302025-02-20T18:35:16+5:30
मिरज : मिरज शहरातील मोठ्या रुग्णालयातून ब्रॅण्डेड कंपनीचे महागडे नळ चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली. नळ चोरीच्या या नव्या प्रकाराने ...

Sangli: रुग्णालयातून महागडे नळ चोरणाऱ्यास अटक, चोरीच्या नव्या प्रकाराने पोलीस चक्रावले
मिरज : मिरज शहरातील मोठ्या रुग्णालयातून ब्रॅण्डेड कंपनीचे महागडे नळ चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली. नळ चोरीच्या या नव्या प्रकाराने पोलीसही चक्रावले होते. याप्रकरणी तेजस अनंत सावंत, वय ४०, रा. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी विजयनगर, सांगली यास अटक करून त्याच्याकडून बारा हजार किंमतीचे ब्रँडेड कंपनीचे महागडे ९ नळ हस्तगत करण्यात आले.
मिरजेतील जीवन चिल्ड्रन्स हॉस्पीटल, आय केअर हॉस्पीटल, आकाशदीप नेत्रालय, उषा हिमॉटॉलॉजी हॉस्पीटल, समर्थ न्यूरो हॉस्पीटल यां मोठमोठ्या हॉस्पीटल्स मधील वॉश बेसिन मधील ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ चोरुन नेण्यात आले. यांबाबत गांधी चौक पोलीसात गुन्हा दाखल करुन चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला. विविध रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून तेजस सावंत यां चोरट्याचे नाव पोलिसांना समजले.
तेजस सावंत हा चोरलेले महागडे नळ विक्रीसाठी मिरजेत आण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आल्याची माहिती मिळाल्याने सावंत यास ताब्यात घेण्यात आले. तेजस सावंत याचेकडून १२ हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे महागडे नळ व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. सावंत हा रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे दुरुस्तीचे काम करतो. मोठ्या हॉस्पिटल्समध्ये दुरुस्ती कारागीर असल्याच्या बहाण्याने जावून तेथील बाथरुमधील महागडे नळ चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पुढील तपास करीत आहेत.