कामेरीत नाश्त्याच्या कारणातून पती-पत्नीमध्ये वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:49+5:302021-09-25T04:27:49+5:30

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे नाश्ता व्यवस्थित न केल्याच्या कारणातून पती-पत्नीमध्ये वादावादी झाली. यावेळी परस्परांना झालेल्या मारहाणीत पाचजण ...

Arguing between husband and wife over breakfast in Kameri | कामेरीत नाश्त्याच्या कारणातून पती-पत्नीमध्ये वादावादी

कामेरीत नाश्त्याच्या कारणातून पती-पत्नीमध्ये वादावादी

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे नाश्ता व्यवस्थित न केल्याच्या कारणातून पती-पत्नीमध्ये वादावादी झाली. यावेळी परस्परांना झालेल्या मारहाणीत पाचजण जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

सीमा माणिक टोमके यांनी दिलेल्या फिर्यादीत पती माणिक पांडुरंग टोमके याने सीमा यांना स्टीलच्या तांब्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले, तर विनोद बल्लाळ याला काठीने मारहाण केली, तर मुलगा शमूवेग, आई लीलाबाई यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे.

माणिक टोमके यांनी दिलेल्या फिर्यादीत, पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला होता. तो मिटविण्याचे सुरू असताना पत्नी सीमा हिचा भाऊ विनोद पांडुरंग बल्लाळ, सचिन पांडुरंग बल्लाळ, लीलाबाई पांडुरंग बल्लाळ अशा तिघांनी घरात घुसून शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.

शुक्रवारी सकाळी नऊच्यासुमारास नाश्ता व्यवस्थित केला नसल्याच्या कारणातून माणिक आणि सीमा यांच्यामध्ये वाद झाला. पत्नी सीमा या शिवीगाळ करू नका, असे सांगत असताना पती माणिक यांनी स्टीलचा तांब्या घेऊन तिच्या डोक्यात मारत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या पती-पत्नीच्या भांडणादरम्यान भांडण सोडविण्यासाठी आलेल्या इतरांनाही मार खावा लागला.

Web Title: Arguing between husband and wife over breakfast in Kameri