शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रात भांडवली घरपट्टी लागू

By admin | Updated: August 9, 2015 00:48 IST

अधिसूचना प्रसिद्ध : जुन्या मालमत्तांना फटका

सांगली : भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू करण्याची सूचना यापूर्वीच राज्य शासनाने दिली होती. त्यानुसार शनिवारी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. सूचना व हरकतींचा विचार करून त्यानंतर ही भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली जाणार आहे. त्यामुळे जुन्या मालमत्तांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात १ लाख १५ हजार मालमत्तांची नोंद झाली आहे. आणखी काही मालमत्तांच्या नोंदी नव्याने होणार आहेत. अशा परिस्थितीत आता भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीचा शिरकाव झाल्याने घरपट्टीमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. महापालिका क्षेत्रातील गावठाणातील जुन्या इमारतींची घरपट्टी सध्या कमी आहे. त्यांना भांडवली मूल्याच्या घरपट्टीचा मोठा दणका बसण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर नव्या इमारतींच्या घरपट्टीतही वाढ होणार आहे. महापालिका क्षेत्रातील घरपट्टी अन्य महापालिकांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीमुळे फारसा फरक पडणार नाही, असे मत काही जाणकार नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. महापालिकेतील निवृत्त जाणकार अधिकाऱ्यांनाही असेच वाटते. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या आता नव्याने नोंदी घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पूर्वीच्या आणि आताच्या घरपट्टीत नेमका किती फरक पडणार आहे, याचा अंदाज आताच लागणे कठीण आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता नव्या कर आकारणीसाठी तयारी सुरू केली आहे. हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन नंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आणखी किमान दीड महिना तरी ही प्रक्रिया चालेल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)