नालसाब मुल्ला खूनप्रकरणी आणखी एक ताब्यात, मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेची कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 18:55 IST2023-07-04T18:55:09+5:302023-07-04T18:55:26+5:30

सांगली : नालसाब मुल्लाच्या खुनाच्या कटातील आणखी एक सूत्रधार प्रवीण अशोक बाबर याचा कळंबा कारागृहातून पोलिसांनी आज ताबा घेतला. ...

Another arrest in Nalsab Mulla murder case | नालसाब मुल्ला खूनप्रकरणी आणखी एक ताब्यात, मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेची कसून चौकशी

नालसाब मुल्ला खूनप्रकरणी आणखी एक ताब्यात, मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेची कसून चौकशी

सांगली : नालसाब मुल्लाच्या खुनाच्या कटातील आणखी एक सूत्रधार प्रवीण अशोक बाबर याचा कळंबा कारागृहातून पोलिसांनी आज ताबा घेतला. त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेसह तो ‘मोका’अंतर्गत गुन्ह्यात कारागृहात होता. तेथून त्याने हल्लेखोरांना दुचाकी पुरवण्यासह अन्य मदत केल्याचे तपासात पुढे आले.

मुल्ला खूनप्रकरणी पोलिसांकडून मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे याची कसून चौकशी सुरू आहे. चार हल्लेखोरांनी मुल्लावर चौघांनी गोळीबार करत निर्घृण खून केला होता. या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता प्रवीण बाबर याचाही कटात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार न्यायालयाच्या परवानगीने ताबा घेण्यात आला.

Web Title: Another arrest in Nalsab Mulla murder case