शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

नाराज माजी संचालक मोट बांधणार

By admin | Updated: August 1, 2015 00:35 IST

भारत डुबुले: ताकद दाखवू, दोन दिवसात निर्णय

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी संचालकांना डावलण्यात आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नाराज संचालकांंची मोट बांधण्याची तयारी सुरू असून, यासंदर्भात आगामी दोन दिवसात भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीप्रणित शेतकरी सहकारी पॅनेल व काँग्रेसप्रणित वसंतदादा रयत पॅनेलमध्ये माजी संचालकांना स्थान देण्यात आलेले नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत दीडशे कोटीचा घोटाळा झाला असताना तेथे माजी संचालकांना स्थान देण्यात आले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालकांनी तीस कोटीचा निधी शिल्लक ठेवला आहे. यापूर्वी तेथे कर्मचाऱ्यांचे पगार करताना अडचणी होत होत्या. असे असताना त्यांना का डावलण्यात आले, असा सवाल माजी संचालक करीत आहेत. माजी सभापती भारत डुबुले म्हणाले की, नेतेमंडळींनी आम्हाला विचारत घेतले नाही. आता त्यांनी आम्हाला आगामी निवडणुकीत गृहित धरू नये. उमेदवारी जाहीर करताना विचारातही घेतले नाही. बाजार समितीमध्ये चांगली कामगिरी झाली असताना माजी संचालकांना डावलण्यात आले आहे. जिल्हा बँकेत माजी संचालकांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात असताना बाजार समितीमध्ये का संधी दिली जात नाही? याबाबत माजी संचालकांशी चर्चा करून आगामी दोन दिवसात आम्ही आमची भूमिका जाहीर करु. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांमध्ये चुरसमार्केट यार्डमध्ये व्यापारी प्रतिनिधी व हमाल-तोलाईदार प्रतिनिधींमध्ये चुरस वाढली आहे. प्रचारासाठी उपस्थित राहताना नेतेमंडळींची कसरत होत आहे. सध्यातरी व्यापारी, हमाल नेते सर्वांच्याच प्रचारासाठी उपस्थित रहात आहेत. हमाल प्रतिनिधीसाठी बाळासाहेब बंडगर यांच्या प्रचाराला शुक्रवारी प्रारंभ झाला.