जतमध्ये कर्नाटक सीमेवर अज्ञाताचा खून, पोत्यात भरून मृतदेह रस्त्याकडेला टाकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:58 IST2023-08-02T15:57:44+5:302023-08-02T15:58:07+5:30

आरोपीची नवी शक्कल

An unknown person was killed on the Karnataka border in Jat sangli | जतमध्ये कर्नाटक सीमेवर अज्ञाताचा खून, पोत्यात भरून मृतदेह रस्त्याकडेला टाकला

जतमध्ये कर्नाटक सीमेवर अज्ञाताचा खून, पोत्यात भरून मृतदेह रस्त्याकडेला टाकला

उमदी : महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर जिगजेवणी (ता. चडचण) येथील कल्याळ वस्तीवर एका अनोळखीच्या खुनाचा प्रकार समाेर आला आहे. ३५ ते ४० वयाच्या व्यक्तीचा खून करुन मृतदेहाचे चार तुकडे करून, पोत्यात घालून रस्त्याकडेला टाकण्यात आले आहेत.

मृत व्यक्ती महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्र व कर्नाटकपोलिस मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जत तालुक्यातील सुसलाद गावास लागून असलेल्या कर्नाटकातील जिगजेवणी येथे हा प्रकार घडला आहे. हल्लेखाेरांनी अत्यंत क्रूरपणे हा खून केला असून, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्नही केला आहे. कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर मृतदेह टाकल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. मात्र महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी समन्वयाने तपास सुरु केला आहे. लवकरच आरोपीचा शोध घेऊन आरोपीला बेड्या ठोकू, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपीची नवी शक्कल

कर्नाटकात खून करायचा आणि मृतदेह महाराष्ट्रात आणून टाकायचा तसेच महाराष्ट्रात खून करायचा अन् कर्नाटक सीमाभागात मृतदेह टाकायचे असा प्रकार गेल्या काही वर्षांत सुरु झाला आहे. आज पुन्हा हा प्रकार हल्लेखाेरांनी अवलंबला आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीची शक्कल असल्याचे दिसते आहे.

Web Title: An unknown person was killed on the Karnataka border in Jat sangli