सांगली: कासेगावमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 14:21 IST2022-07-22T13:45:10+5:302022-07-22T14:21:57+5:30

प्रताप बडेकर कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे अज्ञाताने डोक्यात दगड घालून एका वृद्धाचा खून केला. मज्जीद युसूफ अत्तार ...

An old man was killed by a stone on his head in Kasegaon sangli district | सांगली: कासेगावमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धाचा खून

सांगली: कासेगावमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धाचा खून

प्रताप बडेकर

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे अज्ञाताने डोक्यात दगड घालून एका वृद्धाचा खून केला. मज्जीद युसूफ अत्तार (वय ६०, रा. कासेगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना काल, गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. कासेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. खूनाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मज्जीद अत्तार यांचे मुळ गाव कासेगाव आहे. सध्या ते शेणे (ता. वाळवा) येथे त्यांच्या बहिणीकडे राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. कामानिमित्त ते कासेगावला नेहमी ये-जा करत. काल, गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कासेगावला कामानिमित्त आले होते. दरम्यान रात्री ११ च्या सुमारास कासेगाव येथील राजारामबापू साखर कारखाना गट कार्यालया नजीक त्यांचा मृत्यूदेह काही नागरिकांना आढळुन आला.

याबाबत नागरिकांनी कासेगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता अज्ञाताने अत्तार यांच्या डोक्यात दगड घालुन त्यांचा खुन केल्याचे निदर्शनास आले. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Web Title: An old man was killed by a stone on his head in Kasegaon sangli district