amit shah rally in maharashtra assembly election for bjp | ''राहुल म्हणाले होते, काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, पण एक गोळीसुद्धा चालली नाही''
''राहुल म्हणाले होते, काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, पण एक गोळीसुद्धा चालली नाही''

जतः भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगलीतल्या जत येथे प्रचारसभा घेतली होती. त्या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून देशाला एक करण्याचं काम केलं आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं याला विरोध केला होता. कलम 370 हटवल्यास काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं म्हणणं होतं. राहुल गांधीजींनीही असं म्हटलं होतं, पण तसं काहीही झालं नसल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. पाच ऑगस्ट 2019ला कलम 370 हटवण्यात आलं. आता 5 ऑक्टोबर ही तारीख उलटून गेली आहे. रक्ताच्या नद्या तर सोडाच, काश्मीरमध्ये एक गोळीसुद्धा चालली नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत असल्याचा टोला भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज जत येथील प्रचारसभेत लगावला. तसेच राज्यात 15 वर्षे केलेल्या कारभारावरूनही अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना केंद्रात 10 वर्षे आणि राज्यात 15 वर्षे सत्तेत असताना काय केले, याचा हिशेब शरद पवार यांनी द्यावा, असे आव्हान अमित शहा यांनी दिले. 

''पूर्वी पंतप्रधानांनी परदेश दौरा केला तरी कुणाला कळतही नसे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात. तेव्हा तेथील लोक त्यांचे थाटात स्वागत करतात. मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जातात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत आहे. पण मोदी मोदीच्या दिल्या जाणाऱ्या घोषणा हा काही मोदींचा किंवा भाजपाचा सन्मान नाही. तर तो या देशातील सव्वाशे कोटी नागरिकांचा सन्मान आहे, असे अमित शहा म्हणाले. दरम्यान, आज जत येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी पुन्हा एकदा कलम 370 चा उल्लेख केला. 70 वर्षांनंतर कलम 370 हटवण्यात यश आले. कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरमधील जनता आता शांतता अनुभवत आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा निर्णयांना विरोध होत आहे, अशी टीका त्यांनी केली. 
 

Web Title: amit shah rally in maharashtra assembly election for bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.