शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

अंबकचे ‘जेसीबी मामा’ खुदाईकामात पारंगत

By admin | Updated: March 13, 2015 23:54 IST

काबाडकष्टातून कमाई : कुटुंबात समाधान; तासाभरात काढतात जलवाहिनीची गळती

प्रताप महाडिक - कडेगाव  जलवाहिनीची गळती काढण्याचे काम जेसीबी यंत्रापेक्षा कमी वेळात फत्ते करणारे अंबक येथील मलकाप्पा नाटेकर (वय ४५) हे ‘जेसीबी मामा’ म्हणून सोनहिरा खोऱ्यात परिचित आहेत. परिसरातील पाणीपुरवठा योजनेला किंवा शेतकऱ्यांच्या जलवाहिनीला गळती लागली की, ‘जेसीबी मामां’चा भ्रमणध्वनी वाजतो. ते तात्काळ सायकलवर खोरे, टिकाव, पाटी घेऊन संबंधित ठिकाणी पोहोचतात. एका तासात गळती काढून पुढील कामास रवाना होतात! खुदाई कामात पारंगत असलेल्या जेसीबी मामांनी दोन मुलांचे शिक्षण व मुलीचे लग्न करून पुणे आणि विजापूर येथे स्वत:चे घर बांधले आहे.
मलकाप्पा नाटेकर यांचे मूळ गाव विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील गोडीआळ. मलकाप्पांच्या वडिलांनी दारूच्या व्यसनात सर्व शेतजमीन विकून टाकली. २० वर्षांपूर्वी मलकाप्पा मोलमजुरीसाठी अंबक येथे आले. त्यानंतर काही काळ पुण्यात मोलमजुरीचे, खुदाईचे काम केले. सोनहिरा कारखान्याच्या पायाभरणीवेळी सातत्याने पाच वर्षे खुदाईचे काम केले. प्रामाणिकपणे आणि जलद काम केल्यामुळे कष्टाचा योग्य मोबदलाही मिळत गेला. पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब पुण्यात ठेवले आणि एकटे मलकाप्पा काबाडकष्ट करीत राहिले. जलवाहिनीची गळती काढणे हे काम त्यांचा हातखंडा ठरू लागले. दिवसातून पाच ते आठ ठिकाणी ते गळती काढतात. आजच्या दराने दररोज दोन ते तीन हजार रुपये मिळतात. जेथे गळती काढली, तेथे पुन्हा गळती लागली, तर मलकाप्पा ती मोफत काढून देतात. एका मजुराकडून कामाची ‘गॅरंटी’ मिळते, याचे शेतकऱ्यांना कुतूहल वाटते.
वीस ते पंचवीस वर्षांपासून सातत्याने खुदाई काम करणारे सहा फूट उंचीचे मलक्काप्पा टिकावाने १० ते १५ मिनिटात गळती शोधतात. गळती लागलेल्या ठिकाणचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन जलवाहिनीचा जोड ठेवून, रस्ता पुन्हा बुजवून एका तासात काम फत्ते करतात. हे काम जेसीबी यंत्राच्या साहाय्यानेही इतके जलद होत नाही, म्हणूनच ते ‘जेसीबी मामा’ म्हणून परिचित झाले आहेत.
सोनहिरा खोऱ्यातील १५ गावांमधून जेसीबी मामांना जलवाहिनीची गळती काढण्यासाठी बोलावणे येते. सायकलस्वारी करीत ते कामाच्या ठिकाणी पोहोचतात. सायकलच्या ‘डिकी’वरही ‘जेसीबी मामा’ असा फलक त्यांनी लावला आहे. पुढे यल्लम्मादेवीचे छायाचित्र आहे. अमावास्येच्या दिवशी जेसीबी मामांचे काम बंद असते. त्यावेळी ते देवदर्शनाला जातात. खुदाई-गळतीचे काम करताना ते मोबाईलवर देवाची गाणी लावतात. बॅटरी डिसचार्ज झाली की तात्काळ दुसरी बॅटरी टाकतात, परंतु मोबाईल सदैव सुरू असतो. ‘प्रामाणिक माणसाला मोबाईल बंद ठेवायची गरज नसते. ज्यांना आपली गरज आहे, ते बोलावून घेतात,’ हा त्यांचा आत्मविश्वास खूप काही सांगून जातो.

मामांचे अन्नदान
जेसीबी मामा दरवर्षी कष्टातून मिळालेल्या कमाईतून अन्नदान करतात. कमाईतील काही हिस्सा दान करावा, यामुळे मानसिक समाधान मिळते. अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणून मी दरवर्षी अन्नदान करतो, असे ते सांगतात.