शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील अजित पाटील यांच्या कुटुंबीयांकडून वनविभागाला दोन एकर जमीन बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 13:07 IST

वनविभागाकडून या जागेवर निसर्ग पर्यटन संकुल उभारणार

सांगली : वन्यजीव संवर्धनासाठी आयुष्य वाहून घेतलेले सांगलीतील दिवंगत मानद वन्यजीव रक्षक अजित उर्फ पापा पाटील यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्मृती अमर ठेवल्या जाणार आहेत. त्यांच्या इच्छेनुसार पाटील कुटुंबीयांनी स्व:मालकीची दोन एकर जमीन वनविभागाच्या नावे केली आहे. या जागेवर आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत निसर्ग पर्यटन संकुल उभारण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे.अजित पाटील यांनी राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उभारणीत व विकासात मोलाचे योगदान दिले. प्रकल्पाच्या निसर्ग पर्यटन विकासात योगदान देण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यानुसार त्यांच्या पत्नी सुरेखा पाटील, कन्या रत्नप्रभा व गौरी यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांच्या मालकीची पानेरी (ता. पाटण, जि. सातारा) येथील दोन एकर जमीन बक्षीसपत्राद्वारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या नावे केली. ढेबेवाडी (जि. सातारा) येथील वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बक्षीसपत्र स्वीकारले.या सहकार्याबद्दल अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन, तसेच व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एम. रामानुजन यांनी आभार मानले. उपसंचालकांनी पाटील कुटुंबीयांचा सत्कार केला. या कामी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व नाना खामकर यांनी सहकार्य केले.

पाच दशके वनसंवर्धनासाठी कार्यरत..पापा पाटील यांनी पाच दशके वनसंवर्धनासाठी काम केले. शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागांच्या पूजेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. जिवंत सापांचे प्रदर्शन थांबविले होते. चांदोली भागातील बेकायदेशीर बॉक्साइट खाणकामाविरोधातही याचिका दाखल केली होती. सह्याद्री खोऱ्यातील नरक्या, सप्तरंगी यांसारख्या वनस्पतींची अवैध तोड व चोरटी वाहतूक उघडकीस आणण्यात मोठा वाटा होता.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग