शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी अ‍ॅडव्हान्स

By admin | Updated: October 18, 2014 23:46 IST

आयुक्तांचे आश्वासन : महापालिका कामगार सभेची मागणी मान्य

सांगली : महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स आणि पाच पगारी रजांचे पैसे एकत्रित देण्याचे आश्वासन आयुक्त अजिज कारचे यांनी कामगारांना दिले. यासंदर्भात महापालिका कामगार सभेने आयुक्तांशी चर्चा केली होती. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडली आहे. एकीकडे व्यापाऱ्यांनी एलबीटीवर बहिष्कार टाकल्याने या विभागाचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांनी घटले आहे. अन्य महसुली विभागांचीही थकबाकी कोट्यवधीच्या घरात आहे. त्यामुळे विकासकामेही ठप्प झाली आहेत. अशातच कर्मचाऱ्यांचे पगारही थकित रहात आहेत. एक महिना विलंबाने कर्मचाऱ्यांना पगार मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे सध्या हाल सुरू आहेत. यंदाच्या दिवाळीत कर्मचाऱ्यांना अ‍ॅडव्हान्स मिळेल की नाही, अशी शंका उपस्थित होत होती. महापालिका कामगार सभेने कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी किमान दहा टक्के बोनस मिळावा आणि दहा हजार रुपये अ‍ॅडव्हान्सपोटी द्यावेत, अशा मागणीची नोटीस दिली होती. दिवाळीपूर्वी २0११ ते २0१३ पर्यंतच्या पगारी रजांचेही पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. कामगार सभेच्या प्रतिनिधींशी आयुक्तांनी चर्चा केली. यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारी रजांचे पैसे, दर तीन महिन्याला पाच दिवसांचा पगार याप्रमाणे देण्याचे मान्य केले. तसेच आॅक्टोबर २0१४ च्या पगारात पाच दिवसांच्या पगारी रजांचे पैसे जमा करण्यात येतील, असे स्पष्ट केले. येत्या सोमवारी अ‍ॅडव्हान्स कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. चर्चेवेळी कामगार सभेचे सचिव अ‍ॅड. अजितराव सूर्यवंशी, विजय तांबडे, एकनाथ माळी, पुंडलिक कांबळे, अशोक कांबळे, सूर्यकांत सूर्यवंशी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)