शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

आमदार होण्यासाठी पण करणाऱ्या कार्यकर्त्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क दिघंची : गोपीचंद पडळकर आमदार व्हावेत यासाठी पायात चप्पल घालणार नाही, असा पण करणारे दत्तात्रय कटरे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

दिघंची : गोपीचंद पडळकर आमदार व्हावेत यासाठी पायात चप्पल घालणार नाही, असा पण करणारे दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी व जालिंदर क्षीरसागर, तसेच फेटा घालणार नाही, असा पण करणारे अमरसिंह देशमुख यांचा सन्मान सोहळा झरे (ता. आटपाडी) येथे पार पडला.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे, राजेंद्रअण्णा देशमुख, ब्रम्हानंद पडळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सभापती भूमिका बेरगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार होण्यासाठी पण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पडळकर यांच्याकडून चांदीची चप्पल व दुचाकी प्रदान करण्यात आली.

दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी यांनी पण केल्यापासून पायात चप्पल घातली नव्हती. जालिंदर क्षीरसागर यांनी केस-दाढीचे पैसे घेतले नव्हते. सध्या क्षीरसागर हयात नाहीत. कार्यकर्त्यांनी हे ऋण फेडण्यासाठी आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी खोत म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम हिमालयाच्या उंचीचे आहे. गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तळागाळातील माणसे उंचावर नेली. सोन्यासारखी माणसे मिळाल्याने सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आमदार झाला.

मी आयुष्यात कधीच चप्पल पुजली नाही, परंतु पडळकरांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी चप्पल पुजली. कार्यकर्त्यांवर प्रेम कसे करावे, हे पडळकर यांच्याकडून शिकावे.

यावेळी अरुण बालटे, मोहन रणदिवे, जयवंत सरगर आदी उपस्थित होते.

चौकट

सध्याचे सरकार आंधळे, मुके व बहिरे

सदाभाऊ खोत म्हणाले की, सध्याचे सरकार आंधळे, मुके व बहिरे आहे. अधिवेशनात विरोधक आवाज उठवतील, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचा बाऊ सरकार करत आहे. हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे.

फोटो ओळी :

झरे (ता. आटपाडी) येथे सन्मान सोहळ्यात माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाषण केले. व्यासपीठावर आमदार जयकुमार गोरे, राजेंद्रअण्णा देशमुख उपस्थित होते.