मंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:40 IST2021-07-27T16:16:59+5:302021-07-27T16:40:17+5:30
Accident Sangli Minister : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. नागठाणे (ता. पलूस ) येथे महापुर स्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री कदम जात होते, त्यावेळी पायलट गाडी रस्त्याकडेच्या विजेच्य खांबावर जाऊन आदळळी. मंत्री कदम पूर्णत: सुरक्षित आहेत.

मंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला अपघात
सांगली : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. नागठाणे (ता. पलूस ) येथे महापुर स्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री कदम जात होते, त्यावेळी पायलट गाडी रस्त्याकडेच्या विजेच्य खांबावर जाऊन आदळळी. मंत्री कदम पूर्णत: सुरक्षित आहेत.
पलूस तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा प्रचंड फटका बसला आहे. त्याच्या पाहणीसाठी डॉ. कदम चार दिवसांपासून पलूस तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सकाळीदेखील ते ताफ्यासह नागठाणे परिसरात फिरत होते. त्यावेळी पुढे धावत असलेल्या पायलट गाडीला एका दुचाकीस्वाराने कट मारला.
दुचाकी अचानक आडवी आल्याने पायलट चालकाचे गाडीवरील नियंत्रण हरवले. रस्ता पुरेसा रुंद नसल्याने व निसरडा झाल्याने पायलट गाडी घसरली. कडेच्या खांबावर जाऊन आदळली व उलटली. गाडीतील दोघे पोलीस कर्मचारी जखमी झाले.
मंत्री कदम यांनी तातडीने गाडी थांबवून पोलीसांच्या मदतीला धाव घेतली. जखमींना स्वत:च्या गाडीत बसवले व आष्टा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील पाहणी दौऱ्यासाठी रवाना झाले. अपघातात पायलट गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस हवालदार सुर्वे व सहकारी पोलीस जखमी झाले.